Iran Israel America War Impact in India : संपूर्णजगाचंलक्षलागूनराहिलेल्या इराण आणि इस्त्रायल-अमेरिका (Iran Israel America War) यांच्यातीलयुद्धदिवसागणिकअधिकतीव्रहोतानादिसतआहे. आखाती देशांमधील युद्धाचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरहोतअसूनसर्वसामान्यांनाहीत्याचीझळसोसावीलागतअसल्याचेचित्रआहे. अशातचआतायायुद्धाचाथेटपरिणाम शेती क्षेत्रावरही पडू लागला. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने शेतीसाठी लागणाऱ्या विविध सिंचन साहित्याच्या (Irrigation Equipment) दरात मोठी वाढ झाली आहे. कच्चे तेल रिफायनरी करताना त्यातून निघणाऱ्या घटकातुन सिंचनचे पाईप निर्मिती होते. या कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्याने तृषार सिंचन, ठिबक सिंचन संच, पीव्हीसी पाईप, मोटार पंप तसेच, मोटरपंप केबल यांच्या किमतीत तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दरम्यान, उन्हाळी हंगामासाठी सिंचनाची तयारी करत असताना अचानक वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांनाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांना हे साहित्य घेताना आता अतिरिक्त 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागत आहे.

सिंचन साहित्याच्या दरात 35 ते 40 टक्क्यांचीवाढ, बळीराजाआर्थिकसंकटात (Irrigation Equipment Prices Hike)

-युद्धापूर्वी तृषार सिंचन सेट 32 हजार 700 होता. तोचदरआता 44 हजार इतकाझालाआहे. म्हणजेत्यात 25 टक्के वाढ झालीय.

-ठिबक सिंचन एकरी 40 हजार खर्च, आता 60 हजार - 30 टक्के वाढ

-पीव्हीसी पाईप 75 एमएम 460, आता 620 रुपये

-पीव्हीसी पाईप 90 एमएम 540, आता 860 रुपये- 40 टक्के वाढ

-मोटार पंप केबल 90 रुपये मीटर, आता 165 रुपये मीटर - 85 टक्के वाढ

-5 एचपी मोटार पंप 22500, आता 24 हजार 500

7.50 एचपी मोटार पंप 31 हजार, आता 34 हजार 200 - 15 टक्के वाढ

Dharashiv : गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार झाल्यास कायदेशीर कारवाई, जिल्हाधिकाऱ्याकडून आढावा बैठक

धाराशिव मधील तुळजापूर आणि येरमाळा येथील आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना लागणारे गॅससाठी मागणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागवला आहे. गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. साठेबाजी करणारावर धाड टाकून जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिल्या आहेत. तसेच गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दररोज शिल्लक गॅस आढावा घेतला जाणार आहे. धाराशिव मध्ये सुरळीत गॅस पुरवठ्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सर्व विभागाची बैठक घेत सूचना केल्या.

Bhandara news : भंडाऱ्यात 38 सिलेंडर जप्त, चौघांवर गुन्हे दाखल

आखाती देशातील युद्धाचा फायदा घेत भंडाऱ्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याचं कारणं पुढं करून सिलिंडरची काळाबाजारी सुरू आहे. घरी वापरायच्या सिलिंडरचा हॉटेल, खानावळमध्ये वापर वाढला आहे. यावर निर्बंध यावा, यासाठी भंडाऱ्यात पुरवठा विभागाच्या वतीनं मागील तीन दिवसांपासून हॉटेल, खानावळवर छापेमारी करण्यात येतं आहे. या कारवाई दरम्यान, नागरिकांचा कुठही उद्रेक होऊ नये, यासाठी भंडाऱ्यात पोलिसांच्या बंदोबस्तात ही छापेमारी करण्यात येतं आहे. भंडारा शहरातील हॉटेलवर छापेमारी करून तिथून घरगुती वापराचे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे.

भंडारा शहरातील चार हॉटेल, लॉन आणि खाणावळ इथं तिसऱ्याही दिवशी छापेमारी करण्यात आली. पांढराबोळी येथील हॉटेल ग्रीन व्हॅली त कारवाईत घरगुती वापराचा सिलिंडर जप्त केला आहे. तीन दिवसात केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३८ सिलिंडर जप्त केले असून चौघांवर गुन्हे दाखल केले आहे. भंडाऱ्यात घरगुती वापराच्या सिलिंडरचा तुटवडा नाही, नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन करताना ही कारवाई सातत्यानं होत राहणार असून त्यासाठी पुरवठा विभागाच्या विशेष पथकाची नियुक्ती केल्याची माहिती, जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी दिलीय.