एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

International Tea Day : निमित्त काहीही असो, एक कप चहा तर हवाच; आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा करतात? 

International Tea Day 2025 : भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. बहुतांश भारतीयांच्या दिवसाची सुरुवात ही एक कप चहाने होते.

मुंबई : कुणाचे डोके दुखत असो वा कुणाला कामाचा ताण आला असेल, कुणाला एकाकी वाटत असेल किंवा कुणी मित्रांच्या घोळक्यात असेल... यावेळी सर्वांच्या ओठावर एकच वाक्य येतं आणि ते म्हणजे 'एक कप चहा होऊन जाऊ दे'. सध्या सर्वत्र पाऊस पडत असल्याने बाहेरच्या हवेत चांगलाच गारवा आला आहे. अशा वेळीही प्रत्येकाच्या घरी चहाचा बेत नक्की होत असतो. भारतीयांसाठी चहा फक्त एक पेय नाही तर तो त्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे. जगभरातही हीच परिस्थिती आहे. त्याचमुळे 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन (International Tea Day) साजरा केला जातो. 

आपल्या जीवनातील चहाचे महत्व तसेच चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर चहा दिन साजरा केला जातो. तसेच चहाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो.

'चाय भी इश्क़ जैसी है, जिसकी आदत पड गयी तो वो कभी छुटती ही नहीं' असं गंमतीनं म्हटलं जातं. आपल्याकडे चहाप्रेमी काही कमी नाहीत. निमित्त काहीही असो, चहा हा हवाच अशीच परिस्थिती आहे. भारतीयांच्या दिवसाची सुरुवात कडक चहाने सुरू होते. कामावर असतानाही ब्रेक हे निमित्त मात्र असते, तिथेही चहाचा आस्वाद घेतला जातो. रात्री उशीरा जागायचे असेल तर चहा हाच आधार असतो. 

International Tea Day History : आंतरराष्ट्रीय चहा दिवसाचा इतिहास

चहाचा शोध चीनमध्ये लागला. चीन आणि भारत हे जगातील सर्वात मोठे चहा उत्पादक देश आहेत. चहा उत्पादनामध्ये आणि त्याच्या सेवनामध्ये भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. एका आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 8,37,000 टन चहा सेवन केला जातो. भारतानेने 2015 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवायचा प्रस्ताव दिला. भारताचा हा प्रस्ताव 2019 साली स्वीकारण्यात आला आणि 2020 साली पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 मे हा जागतिक चहा दिवस साजरा केला. 

Theme of International Tea Day 2025 : यंदाच्या चहा दिनाची थीम

दरवषी चहा दिन साजरा करताना त्याची एक थीम तयार केली जाते. त्या आधारे पुढील वर्षभर काम केलं जातं. यंदाच्या चहा दिनाची थीम ही 'टी फॉर बेटर लाईव्ह्स' (Tea for Better Lives) अशी आहे. 

History Of Tea In India : भारतात चहाची सुरुवात कशी झाली? 

म्यानमार आणि आसामच्या पर्वतीय भागात 1824 सालच्या दरम्यान चहाची पानं सापडली. त्यानंतर इंग्रजांनी 1836 सालापासून चहाचे उत्पादन सुरु केलं. सुरुवातीला यासाठी चीनमधून चहाचे बी मागवले जायचे. त्यानंतर आसामच्या भागातील चहाच्या बियांचा वापर सुरु झाला. भारतातील चहाचे उत्पादन हे ब्रिटनमधील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी केलं जायचं. आज चहा भारतातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पेय आहे. आसामचा चहा सर्व जगभर प्रसिद्ध आहे.

Benefits Of Tea : चहा पिण्याचे फायदे काय? 

चहामध्ये प्रोटिन, पॉलीसॅकेराइड, पॉलिफेनॉल, मिनरल्स आणि अमिनो, कार्बनिक अॅसिड, लिग्निन आणि मिथाइलक्सैन्थिन (कॅफिन, थिओफिलाइन आणि थियोब्रोमाइन) हे घटक असतात. हे शरीराला फायदेशीर असतात. चहामध्ये फायटोकेमिकल्स असतात जे आपल्या शरीरात शक्तिशाली अॅन्टीऑक्सिडन्ट्स म्हणून कार्य करतात.

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics : MNS सोबत युतीचा प्रस्ताव नाही, निर्णय INDIA आघाडी घेईल - हर्षवर्धन सकपाळ.
Mahayuti Formula: महायुतीचा स्थानिक निवडणुकीचा फॉर्म्युला काय? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Local Body Polls: नागपूर मनपा आरक्षण जाहीर, दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार?
Maharashtra Local Body Elections: भंडारा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली, परिणय फुकेंनी रणनीती सांगितली
Civic Polls Reservation: महापालिका निवडणुकांमध्ये महिला राज, Mumbai, Pune, Nashik मध्ये निम्म्या जागा राखीव.

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Embed widget