देहरादून : उत्तराखंडमधील खेळाडूंना राज्य सरकार किती प्रमाणात प्रोत्साहन देते, याची प्रचिती देहरादूनमध्ये समोर आली आहे. देहरादूनमध्ये राहणारी देशातील पहिली अपंग नेमबाज दिलराज कौर आर्थिक संकटाशी झुंज देत आहे, सध्या ती गांधी पार्कच्या बाहेर आपल्या वृद्ध आईबरोबर फराळ व बिस्किटे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव झळकावलं
पॅरालंपिक नेमबाजीत एकेकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक जिंकणारी दिलजित कौर सध्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. दिलराज कौर हे खेळाडू म्हणून लहान नाव नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक रौप्य, राष्ट्रीय पातळीवर 24 सुवर्ण अशी अनेक पदके तिने जिंकली आहेत, एवढेच नाही तर जागतिक पॅरा क्रीडा क्षेत्रातील पहिली प्रमाणित प्रशिक्षक, क्रीडा शिक्षिका अशा अनेक कामगिरी तिने केल्या आहेत. पण, सध्या सगळीकडूनच ती संकटात अडकली आहे. अशा परिस्थितीने तिच्या डोक्यावरील बाप आणि भावाचं छत्र हिरावलं गेलं. 


परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला आरसा दाखविण्यासाठी गांधी उद्यानाच्या बाहेर आपल्या वृद्ध आईबरोबर स्नॅक्स आणि बिस्किटे विकायला भाग पडलंय. बचतीच्या रूपात असलेले काही पैसे वडिलांच्या गंभीर आजारावर खर्च झाले. आता म्हाताऱ्या आईच्या उपचारासाठी आणि तिच्या खर्चासाठी दुसरा पर्याय नव्हता म्हणून गांधी उद्यानाबाहेर स्नॅक्स आणि बिस्किटांची विक्री करण्यास सुरुवात केल्याचे तिने सांगितले.


आंतरराष्ट्रीय स्तरावर शूटिंगमध्ये पदक जिंकणार्‍या मुलीची अवस्था पाहून आईलाही अश्रू अनावर होत आहेत. वृद्ध आईसुद्धा आपल्या मुलीच्या मदतीसाठी दिवसभर गांधी पार्कच्या बाहेर बसते आणि जे काही मिळते त्यासह कुटुंबाची काळजी घेते.


अनेक पदके जिंकली
दिलराज कौर नक्कीच एक दिव्यांग आहे. मात्र, तिची जिद्द दृढ राहिली आहे. तिने परिस्थितीपुढे कधीही हार मानली नाही. यामुळेच तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर देश व राज्याचे नाव रोशन केले. अगदी सुरुवातीपासूनच तिने तिचे शूटिंग इतके चांगले केले की ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. शूटिंगच्या रेंजमधील तिचे परिपूर्ण लक्ष्य आजही तिची ओळख आहे. पदवी दरम्यानच तिला शूटिंगची प्रेरणा मिळाली. 2004 मध्ये, तिने 3 ऱ्या उत्तरांचल राज्य नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टलमध्ये पदक जिंकले होते. तेव्हापासून दिलराज कौरने शुटींगच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण, आज परिस्थिती बदलली आहे. दिलराज कौरसाठी सुवर्ण पदकांनी फार काही फरक पडत नाही. कारण हे सर्व करूनही आज दिलराज कौरला पोट भरण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलंय.


दिलराज हार मानणारी नाही
परिस्थिती इतकी वाईट होईल याचा विचार दिलराज कौरने केला नव्हता. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे आज आंतरराष्ट्रीय खेळाडूवर वाईट वेळ आली आहे. पण, तिने आजही हार मानलेली नाही. ती म्हणते की कोणतेही काम लहान नाही. हे तिच्यासाठी स्वावलंबन आहे.