Instagram data breach news : सायबरसुरक्षा कंपनी मालवेअरबाइट्सच्या माहितीनुसार, सुमारे 1 कोटी 75 लाख इंस्टाग्राम वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला आहे. हॅकर फोरमवर आधीच प्रसारित होत असलेल्या या लीक झालेल्या डेटामध्ये युझरनेम, पूर्ण नावे, ईमेल पत्ते, फोन नंबर, पत्त्याचे काही भाग आणि इतर संपर्क माहितीचा समावेश आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांच्या प्रोफाइल मोठ्या प्रमाणात स्क्रॅप करणे, गुप्तपणे माहिती गोळा करणे आणि नंतर गायब होणे शक्य असल्याची माहिती मालवेअरबाइट्सकडून दण्यात आली आहे. दरम्यान, इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने अद्याप या डेटा उल्लंघनाबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही.
मालवेअरबाइट्सच्या चालू असलेल्या डार्क वेब मॉनिटरिंग प्रयत्नांदरम्यान हा डेटा लीक झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत कंपनीने चेतावणी दिली आहे की, हल्लेखोर या लीक झालेल्या डेटाचा वापर करून ओळख चोरणे, फिशिंग हल्ले आणि क्रेडेन्शियल चोरीसारखे प्रकार करू शकतात. अनेकदा खात्यांवर ताबा मिळवण्यासाठी इन्स्टाग्रामच्या पासवर्ड रीसेट प्रक्रियेचा फायदा घेतात.
तुमचे खाते हॅक झाले असेल तर सुरक्षित करण्यासाठी काय करावे?
1. इंस्टाग्रामकडून आलेले सुरक्षा ईमेल तपासा
जर तुम्हाला security@mail.instagram.com वरून तुमच्या खात्यातील बदलांविषयी, जसे की ईमेल किंवा पासवर्ड अपडेट, सूचित करणारा ईमेल आला असेल, तर तुम्ही त्या संदेशातील 'माझे खाते सुरक्षित करा' (Secure my account) हा पर्याय निवडून ते बदल पूर्ववत करू शकता.
2. लॉगिन लिंकची विनंती करा
तुमच्या खात्याचा पुन्हा ॲक्सेस मिळवण्यासाठी:
1. लॉगिन स्क्रीनवर 'पासवर्ड विसरलात?' (Forgotten password?) वर टॅप करा.2. तुमचे वापरकर्तानाव, ईमेल किंवा फोन नंबर टाका, त्यानंतर 'लॉगिन लिंक पाठवा' (Send login link) वर क्लिक करा.3. कॅप्चा पूर्ण करा आणि 'पुढील' (Next) वर क्लिक करा.4. तुमच्या ईमेल किंवा एसएमएसवर पाठवलेल्या लिंकचा वापर करून लॉग इन करा आणि सूचनांचे पालन करा.
जर तुमच्याकडे संबंधित ईमेल, फोन किंवा वापरकर्तानावचा ॲक्सेस नसेल, तर पुढील मार्गदर्शनासाठी इंस्टाग्रामच्या मदत पृष्ठाला भेट द्या.
3. सुरक्षा कोड किंवा समर्थनाची विनंती करा
जर लॉगिन लिंक काम करत नसेल, तर तुम्ही मोबाइल डिव्हाइसवर समर्थनाची विनंती करू शकता:तुम्ही ॲक्सेस करू शकाल असा एक सुरक्षित ईमेल पत्ता द्या.
इंस्टाग्राम तुम्हाला पुढील पायऱ्या ईमेलद्वारे पाठवेल.
4. तुमची ओळख सत्यापित करा
तुमच्या खात्याच्या प्रकारानुसार:
फोटो नसलेली खाती: तुमच्या खात्याशी जोडलेला ईमेल/फोन नंबर आणि नोंदणी करताना वापरलेले डिव्हाइस प्रदान करा.
फोटो असलेली खाती: तुमचा चेहरा वेगवेगळ्या दिशांना फिरवत एक व्हिडिओ सेल्फी सादर करा. हा व्हिडिओ केवळ तुमची ओळख सत्यापित करण्यासाठी वापरला जाईल, तो कधीही पोस्ट केला जाणार नाही 30 दिवसांच्या आत हटवला जाईल.
जर पडताळणी अयशस्वी झाली, तर तुम्ही पुनरावलोकनासाठी नवीन व्हिडिओ सादर करु शकता.
5. तुम्ही अजूनही लॉग इन करू शकत असाल, तर तुमचे खाते सुरक्षित करा
तुमचा पासवर्ड त्वरित बदला.टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा.तुमचा फोन नंबर आणि ईमेल अचूक असल्याची खात्री करा.अकाउंट्स सेंटर तपासा आणि अपरिचित लिंक केलेली खाती काढून टाका. संशयास्पद थर्ड-पार्टी ॲप्सचा ॲक्सेस रद्द करा.