Indus Water Treaty : सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
Indus Water Treaty : भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार भारताने स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने स्थायी लवाद न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र भारताने या न्यायालयाचा निकाल थेट फेटाळून लावला आहे.

Indus Water Treaty Dispute : रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, ही भारतीय पंतप्रधानांची घोषणा आता पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धक्का ठरली आहे. भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर पाकिस्तानात पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पाकिस्तान सरकारकडे आता केवळ 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन'च्या (Permanent Court of Arbitration) निर्णयाचा कागद उरला आहे, ज्याला भारताने आधीच बेकायदेशीर आणि अमान्य घोषित केले आहे.
पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादी कारवायांना उत्तर म्हणून भारताने जेव्हा 1960 चा 'सिंधू पाणी करार' (Indus Water Treaty) स्थगित केला, तेव्हा शहबाझ शरीफ सरकारची मोठी कोंडी झाली. पाकिस्तानने नेदरलँड्स येथील न्यायालयात भारताची तक्रार केली होती. न्यायालयाने 1960 चा करार लागू ठेवण्याचे आदेश दिले असले तरी, भारताने स्पष्ट केले आहे की भारत या न्यायालयाचे अधिकारक्षेत्र मानत नाही. त्यामुळे हा निकाल भारतासाठी केवळ 'कागदाचा तुकडा' आहे.
Indus Water Treaty PCA Verdict : पाकिस्तानचा औपचारिक विरोध
आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने उपस्थित राहण्यास आणि निकाल मानण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर तीव्र विरोध दर्शवला आहे. 60 वर्षे जुना हा जलवाटप करार कायदेशीररीत्या बंधनकारक असून कोणताही देश एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही, असा दावा इस्लामाबादने केला आहे. पाकिस्तानने शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) व्यासपीठावरही हा मुद्दा उपस्थित केला, मात्र भारताने आपली भूमिका ठाम ठेवली आहे.
India Pakistan Water Conflict : भारताची स्पष्ट आणि कठोर भूमिका
नवी दिल्लीने सिंधू पाणी करार पूर्णपणे स्थगित ठेवला आहे. पाकिस्तानने जोपर्यंत सीमापार दहशतवाद कायमस्वरूपी आणि पडताळणीयोग्य पद्धतीने थांबवला जात नाही, तोपर्यंत या करारावर पुनर्विचार केला जाणार नाही, अशी भारताची अट आहे. तसेच, हेग (The Hague) येथील स्थायी लवाद न्यायालयाची स्थापना करारातील मूळ नियमांचे उल्लंघन करून झाली आहे, त्यामुळे त्याचे कोणतेही अंतरिम आदेश भारताच्या सार्वभौम धोरणांवर लागू होत नाहीत.
Pakistan Diplomatic Crisis : जागतिक स्तरावर पाकिस्तान एकाकी
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मध्यस्थीद्वारे भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. बिश्केक (Bishkek) येथे झालेल्या बैठकीत पाकिस्तानने सिंधू नदीच्या पाण्याचा मुद्दा मांडला, परंतु त्याचा मित्र देश असलेल्या चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. भारताने स्पष्ट केले आहे की, द्विपक्षीय मुद्द्यांवर तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.
ही बातमी वाचा:
Before You Go
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं





















