एक्स्प्लोर

एकतर आम्हाला पाणी द्या नाहीतर युद्धासाठी तयार राहा, बिलावल भुट्टोची पोकळ धमकी, भारताचं एका ओळीत चोख प्रत्युत्तर 

सिंधू नदी पाणी कराराच्या पाण्यावरुन पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला पोकळ धमकी दिली होती. त्यांच्या या धमकीला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Indus River Water Treaty : जर सिंधू नदीचे पाणी थांबवले (Indus River Water Treaty) तर आम्ही सर्व सहा नद्या ताब्यात घेऊ, युद्धापासूनही मागे हटणार नाही अशी पोकळ धमकी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) प्रमुख आणि माजी पाकि स्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी दिली होती. त्यांच्या या धमकीला भारताने चोख उत्तर दिले आहे. जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी एका ओळीत भुट्टो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या पोकळ धमक्यांची भीती वाटत नाही. पाणी कुठेही जाणार नाही, जे काही बोलायचे आहे ते बोलत राहा असे सीआर पाटील म्हणाले. 

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली होती. भारताने घेतलेल्या पाच प्रमुख निर्णयांपैकी पाकिस्तानला सर्वात जास्त रडवणारा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणे. पाकिस्तानला भारताचा हा निर्णय जिव्हारी लागला आहे. बिलावल भुट्टो झरदारी आजकाल पाकिस्तानात असो वा परदेशात, ते फक्त सिंधू पाण्याचा मुद्दा उपस्थित करतात आणि भारताला युद्धाची धमकी देत ​​आहेत.

आम्हाला अशा धमक्यांची भीती वाटत नाही

बिलावल भुट्टो झरदारींच्या धमक्यांवर सीआर पाटील म्हणाले की, मी तुम्हाला एका ओळीत सांगू शकतो की पाणी कुठेही जाणार नाही. बिलावल भुट्टो झरदारी जे म्हणतात ते त्यांचा प्रश्न आहे. जर त्यांना तिथे त्यांचे राजकारण करायचे असेल तर ते जे काही बोलायचे आहे ते ते बोलत राहू शकतात. जर पाणी वाहू दिले नाही तर रक्त वाहू लागेल, अशी धमकीही त्याने दिली होती. आम्हाला अशा धमक्यांची भीतीही वाटत नाही. पण काही गोष्टी योग्य वेळीच चांगल्या वाटतात, म्हणून त्यांना योग्य वेळी उत्तर देणे योग्य आहे.'

सिंधू पाणी करार कधीही पूर्ववत होणार नाही : अमित शाह

अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले होते की सिंधू पाणी करार कधीही पूर्ववत होणार नाही. यावर बिलावल भुट्टो झरदारी यांनी मंगळवारी धमकी दिली की, 'जर भारताने सिंधू पाणी करार स्वीकारण्यास नकार दिला तर पाकिस्तान सर्व सहा नद्यांचे पाणी घेईल. भारताने सिंधू पाणी करार सुरू करावा किंवा युद्धासाठी तयार राहावे.' यापूर्वीही बिलावल भुट्टो झरदारी यांचे असेच आक्रमक विधान आले होते. त्यानंतर त्यांनी म्हटले होते की, एकतर त्यांचे रक्त त्यात वाहेल किंवा पाणी वाहील असे भुट्टो म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

Pahalgam Terror Attack : सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्यासह भारताने पाकविरोधात घेतलेली भूमिका किती परिणामकारक? संरक्षण तज्ञांनी सविस्तर सांगितलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget