एक्स्प्लोर

Crime News: दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांबला नाही, मृतदेहासोबत अत्याचार केलेल्या पियूषचा खळबळजनक दावा

indore Crime News: तरुणी त्याच्यावर सार्वजनिकरीत्या विवाहाची कबुली देण्यासाठी दबाव टाकत होती. त्याचवेळी तिच्या चारित्र्यावर संशय आल्याने संतापातून आपण हत्या केल्याचे त्याने आपल्या जबाबात म्हटले आहे.

इंदौर: इंदौर येथे एमबीए शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात आरोपी पियूष धामनोदिया याने पोलिस चौकशीत नवे दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, तो आपल्या प्रेयसीशी (indore Crime News) विवाह करू इच्छित होता; मात्र त्याच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. त्याने असेही सांगितले की, दोघांनी खोलीत गुपचूप सात (indore Crime News) फेरे घेतले होते. तरुणी त्याच्यावर सार्वजनिकरीत्या विवाहाची कबुली देण्यासाठी दबाव टाकत होती. त्याचवेळी तिच्या चारित्र्यावर संशय आल्याने संतापातून आपण हत्या केल्याचे त्याने आपल्या जबाबात म्हटले आहे.(indore Crime News) 

डीसीपी झोन-१ कृष्ण लालचंदानी (Krishna Lalchandani) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदसौर येथील पियूषची ओळख संबंधित विद्यार्थिनीशी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झाली होती. दोघेही एकाच महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते. पियूषला तिच्याशी विवाह करायचा होता; मात्र त्याचे कुटुंबीय तयार नव्हते. जानेवारी महिन्यात त्याने खोलीत दिवा लावून तरुणीला मंगळसूत्र घातले आणि सात फेरे घेतल्याचा दावा केला आहे. मात्र तरुणीला हा संबंध सर्वांसमोर मान्य व्हावा, अशी अपेक्षा होती. आरोपीने चौकशीत असेही सांगितले की, ती इतर मुलांशी ऑनलाईन बोलत असल्याचा त्याला संशय होता.(indore Crime News) 

मोबाईल हॅक करून खासगी चॅट वाचल्याचा दावा

तपासात समोर आले की, पियूषला तिच्यावर संशय येऊ लागला होता. त्याने तिचा मोबाईल हॅक करून खासगी चॅटिंग वाचल्याचा दावा केला आहे. डेटिंग अॅपवरून ती इतरांशी संवाद साधत असल्याचे त्याला दिसल्याचे तो म्हणतो. यानंतरच त्याने हत्या करण्याचे नियोजन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हात-पाय बांधून गळा आवळला

१० फेब्रुवारी रोजी आरोपीने तरुणीला खोलीवर बोलावले. दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ‘मस्करी’च्या नावाखाली तिचे हात-पाय बांधून छातीवर बसत गळा आवळला. ती वाचू नये म्हणून चाकूने वार केल्याचीही माहिती समोर आली आहे.

आत्मा बोलावण्यासाठी केले प्रयत्न

टीआय मनिष मिश्रा (Manish Mishra) यांच्या माहितीनुसार, मोबाईल जप्तीसाठी आरोपीला मुंबईला नेण्यात येणार आहे. तपासात असेही समोर आले की, आरोपीने मुंबईतील नालासोपारा भागात तरुणीची आत्मा बोलावण्यासाठी कथित धार्मिक विधी केले. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून फोटोसमोर फुले, मिठाई, हळद-कुंकू ठेवून तो काही क्रिया करत होता.

हत्येनंतर आत्महत्येचा विचार

आरोपीने पोलिसांना सांगितले की, हत्येनंतर त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मुंबईत पुलावरून उडी मारण्याचा त्याचा विचार होता; मात्र तो धाडस करू शकला नाही. मुंबईत नोकरी शोधण्याचाही प्रयत्न त्याने केल्याचे समोर आले आहे.

लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्यांचे सेवन

चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपीने लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्याची कबुली दिली आहे. १० फेब्रुवारी रोजी त्याने द्वारकापुरी परिसरातील आपल्या खोलीवर तरुणीला ‘व्हॅलेंटाईन वीक’ निमित्त भेट देण्याचे आमिष दाखवून तिला बोलावले. आधी तिला खायला देऊन, डोळ्यावर पट्टी बांधण्याच्या बहाण्याने हात-पाय बांधले आणि त्यानंतर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. विरोध केल्यावर तिच्या तोंडात कापड कोंबून गळा दाबल्याचे तपासात नमूद आहे.

हत्येनंतरही खोलीतच थांबला

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या झाल्यानंतरही आरोपी सुमारे अडीच तास खोलीतच होता. या काळात त्याने मद्यप्राशन केले आणि मृतदेहासोबत अमानुष कृत्य केल्याचा आरोप आहे.

सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आरोपीची ये-जा स्पष्ट दिसून आली आहे. तो तरुणीसोबत खोलीत प्रवेश करताना आणि नंतर बॅग घेऊन बाहेर पडताना दिसत आहे. पोलिसांच्या मते, ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित असावी.

पोलिस कोठडीत चौकशी सुरू

द्वारकापुरी पोलिसांनी आरोपीला रिमांडवर घेतले असून सखोल चौकशी सुरू आहे. आरोपी चौकशीत वारंवार जबाब बदलत असला तरी तांत्रिक पुरावे आणि वैद्यकीय अहवालातून महत्त्वाचे तपशील पुढे आले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, आरोपीने संबंधासाठी दबाव टाकल्याची आणि विरोध केल्यावर हत्या केल्याची कबुली दिली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Rajya Sabha Election 2026: राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
राज्यसभेत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मेगा प्लॅन; राज्यसभेसाठी 2 उमेदवार देणार, नेमकं काय घडतंय?
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Bollywood Actress on Khamenei Death: इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
इराणचे सुप्रीम लीडर खामेनींच्या मृत्यूनंतर आनंदी झालेली बॉलिवूड अभिनेत्री; पण आता म्हणतेय, 'ते माझा जीव घेतील...'
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
युद्ध गुन्हेगारी सुरुच? 7 ते 12 वयातील 165 निष्पाप चिमुरड्या मुली मारल्यानंतर आता भारतात लष्करी सरावातून परतणाऱ्या इराणी युद्धनौकेवर श्रीलंकेजवळ अमेरिकेचा हल्ला; 87 मृत्यूमुखी, 32 जणांचा जीव वाचला
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या घातपाताचा संशय, देवगिरी बंगल्यावर रात्री 20 आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग
राष्ट्रवादीचे 20 आमदार रात्री देवगिरी बंगल्यावर, सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या त्या वस्तू सर्वांसमोर ठेवल्या
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Embed widget