एक्स्प्लोर

IndiGo : श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानाची हवेत इंधन गळती, वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग

IndiGo Emergency Landing : या विमानात 166 प्रवासी प्रवास करत होते, ते सर्वजण सुखरुप असून त्यांच्यासाठी पर्यायी विमानाची सोय करण्यात येत आहे. 

IndiGo Emergency Landing : कोलकाता (Kolkata) ते श्रीनगर (Srinagar) जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या फ्लाइट 6E-6961 ला वाराणसी (Varanasi Airport) विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावी लागली. हवेत असताना विमानात इंधनाची गळती (Fuel Leak) झाल्याचं समजताच क्रू मेंबर्सनी (Crew Members) त्वरीत परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला.

या विमानात एकूण 166 प्रवासी आणि कर्मचारी होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून, त्यांना विमानातून उतरवून आगमन विभागात सुरक्षित नेण्यात आलं.

IndiGo 6E 6961 : विमानतळ प्राधिकरणाकडून चौकशी सुरू

विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असून, वाराणसी विमानतळ प्रशासन आणि स्थानिक पोलीसांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. विमानाच्या इंधन प्रणालीमध्ये नक्की कोणत्या तांत्रिक अडचणी आल्या, याचा तपास घेतला जात आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि विमानतळावरील नियमित कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

Kolkata To Srinagar Flight : प्रवाशांना पर्यायी फ्लाइटने पाठवण्याची तयारी

इंडिगो एअरलाईन्सकडून जाहीर करण्यात आलं आहे की, प्रवाशांना श्रीनगरला पोहोचवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जात आहे. सध्या सर्व प्रवासी सुरक्षित असून, त्यांना वेटिंग रुममध्ये ठेवण्यात आलं आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विमान अद्याप ग्राउंडवर असून, तांत्रिक पथक त्याच्या इंधन गळतीचा तपास करत आहे. प्रवाशांना पुढील फ्लाइटमध्ये पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

अशा घटना जरी अपवादात्मक असल्या, तरी विमान वाहतुकीतील सुरक्षा आणि दक्षता किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित होते. इंडिगोच्या क्रू मेंबर्सनी वेळेवर योग्य निर्णय घेऊन 166 जीव वाचवले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal CM Candidates: बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण? ममता दीदींचा पराभर करणाऱ्या सुवेंदू अधिकारीसह 'या' नावांची चर्चा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत होणार अंतिम नावावर शिक्कामोर्तब
बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? ममता दीदींचा पराभर करणाऱ्या सुवेंदू अधिकारीसह 'या' नावांची चर्चा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत होणार अंतिम नावावर शिक्कामोर्तब
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
कर्जदारांनो सावधान! कर्जाची परतफेड न केल्यास होणार मोठी कारवाई, RBI ने जाहीर केली कठोर नियमावली, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्जदारांनो सावधान! कर्जाची परतफेड न केल्यास होणार मोठी कारवाई, RBI ने जाहीर केली कठोर नियमावली, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Embed widget