Indian Student Shot Dead in Canada: बस स्टँडवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एक भारतीय विद्यार्थिनीची गंभीर जखमी झाली. भारतीय विद्यार्थ्याच्या छातीत गोळी लागली (Indian Student Shot Dead in Canada). जखमी विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही तरूणी 21 वर्षांची होती. तरूणी घरातून निघाली आणि बस स्टॉपवरती बसची वाट पाहत होती. यावेळी दोन कारमधून एकमेकांवर बेछूट गोळीबार (Indian Student Shot Dead in Canada) केला. ही गोळी थेट तरूणीच्या छातीत लागली. गोळी लागल्यानंतर ती जागीच बेशुद्ध पडली. तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकणारनंतर पोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Continues below advertisement


नेमकं काय घडलं?


मृत विद्यार्थिनीचे नाव हरसिमरत रंधावा (वय वर्षे 21) आहे. ती कॅनडामधील ओंटारिया येथील रहिवासी आहे. ती कॅनडातील ओंटारियो येथील मेहॉक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती घरातून निघाली आणि बसस्टॉपवरती येऊन थांबली होती. यावेळी त्याठिकाणी एक कार आली. दोन गटात अचानक गोळीबार सुरू झाला. दोन वाहनांमधून एकमेकांवर गोळ्या झाडल्या जात होत्या.याच गोळीबारावेळी एक गोळी हरसिमरतच्या छातीत लागली. ती जागीच बेशुद्ध पडली. तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. हॅमिल्टन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेचा हरसिमरतशी काहीही संबंध नव्हता. ती निष्पाप होती. दोन टोळीच्या गोळीबारात ती बळी ठरली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.


या घटनेबाबत टोरोंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने देखील दु:ख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 'हरसिमरत रंधावा हिच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला. आम्ही तिच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या कठीण प्रसंगी आम्ही कुटुंबाच्या पाठीशी आहोत' अशी माहिती त्यांनी दिली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळ्या रंगाची कार दिसत आहे. यामधून एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. नंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेत एक निष्पाप बळी गेला आहे.