नवी दिल्ली : येत्या 31 मार्चपासून रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द होणार असल्याच्या सोशल मीडियातील बातम्या या केवळ अफवा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये असे भारतीय रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. या संबंधी सोशल मीडियामध्ये काही बातम्या व्हायरल होत आहेत. 31 मार्चपासून गाड्या रद्द करण्यासंबंधीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो गेल्या वर्षीचा असल्याचंही रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेऊ नये असंही रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्या आता देशभरात सुरु असून यामधून प्रवास करताना नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणं आवश्यक आहे असंही रेल्वेना नागरिकांना आवाहन केलं आहे. जर नागरिकांना तिकीट रद्द करायचं असेल तर त्यांना आपले सर्व पैसे परत मिळतील असंही रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार राम कृपाल यादव यांनी सांगितलं की भारतीय रेल्वेने कोरोना काळात देशातील नागरिकांची मोठी सेवा केली आहे. कया काळात 43 लाख स्थलांतरित मजूरांना आपल्या घरी पोहचवल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :