मुंबई : भारतीय नौदल अर्थात इंडियन नेव्हीमध्ये 'सेलर' 33 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सेलर या पदासाठी फक्त दहावी पास अशी पात्रता असून नेव्ही मध्ये करियर करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी आजपासून म्हणजे 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या दरम्यान अर्ज करावे. आजपासून या भरतीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.
इंडियन नेव्हीच्या रिक्रुटमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून 33 सेलर पदांसाठी भरती करण्यात येणार असून त्यासाठी जवळपास 300 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. ही भरती ऑक्टोबर 2021 च्या बॅचसाठी करण्यात येणार आहे.
आवश्यक पात्रता
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी केंद्रीय शिक्षण मंडळाने मान्यता दिलेल्या कोणत्याही शाळेतून दहावी उत्तीर्ण असायला हवं.
वयोमर्यादा
उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यानचा असावा. महत्वाचं म्हणजे या वयोमर्यादेत कोणत्याही प्रवर्गाला विशेष सवलत देण्यात आली नाही.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया
अर्ज केलेल्या जवळपास 300 उमेदवारांना म्यूजिक टेस्ट आणि पीएफटी म्हणजे मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. यामध्ये सिलेक्ट होण्यासाठी उमेदवाराला शारीरिक चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. या उमेदवारांना सात मिनीटात 1.6 किमीची धाव घ्यावी लागणार आहे. तसेच 20 उठा-बशा आणि 10 पुश-अप काढावे लागणार आहेत.
वेतन
भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर सुरुवातीच्या ट्रेनिंग प्रक्रियेच्या दरम्यान, निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड देण्यात येणार आहे. तो 14,600 रुपये इतका असणार आहे. त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना 3 डिफेन्स पे नुसार
(21,700 ते 69,100) रुपये वेतन देण्यात येणार आहे. त्याचसोबत त्यांना डीए आणि 5200 रुपये एमएसपी देण्यात येणार आहे.
त्यामुळे ही संधी सोडू नका. आजच joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आणि अर्ज करा.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus : काल दिवसभरात 12 जिल्हे अन् 12 महापालिका क्षेत्रात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही, राज्याचा मृत्यूदर काय?
- Petrol Diesel Price : सलग 16व्या दिवशी ग्राहकांना दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर
- डिजिटल पेमेंटमधील महाबलाढ्य कंपन्या एकत्रित; अमेरिकेच्या 'स्केअर'कडे 'आफ्टरपे'चा ताबा, 29 अब्ज डॉलर्सचा व्यवहार