Indian Navy Opens up Special Forces for Women : भारतीय सैन्याच्या (Indian Army) इतिहासात पहिल्यांदाच महिलांना कमांडो (Women Commando) म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy) आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये (Elite Special Forces) महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पहिल्यांदाच महिलांना सैन्यामध्ये कमांडो (Commando) म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविवारी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला ही माहिती दिली. दरम्यान,  अद्याप या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच यासंबंधित ऐतिहासिक घोषणा होण्याची शक्यता आहे.


लष्करात पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी


लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये असणाऱ्या कमांडोंना (Commando) कठोर प्रशिक्षण दिलं जाते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची जबाबदारी असते. या कामामध्ये स्पेशल फोर्स कमांडो निपूण असतात. या कमांडोसाठी आतापर्यंत फक्त पुरुषांना परवानगी होती. पण आता भारतीय नौदल महिलांनाही कमांडो होण्याची संधी देणार आहे.


महिलांना मार्कोस (MARCOS) होण्याची संधी


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रशिक्षणानंतर महिलांनी निकष पूर्ण केल्यास त्यांना नौदलात मरीन कमांडो ( Marine Commandos) म्हणजे मार्कोस (MARCOS) होण्याची संधी मिळेल. भारताच्या लष्करी इतिहासातील हे एक ऐतिहासिक पाऊल असेल. परंतु कोणालाही थेट विशेष दलात (Special Forces) सामील केले जाणार नाही. महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावं लागेल.


अधिकाऱ्याच्या हवाल्याने सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणाऱ्या महिला अधिकारी (Officer) आणि नाविक (Sailors) यांना मार्कोस (MARCOS) प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येईल.


मार्कोस म्हणजे काय? (What is MARCOS) - Marine Commandos)


मार्कोस (MARCOS) म्हणजे मरीन कमांडो (Marine Commandos). मरीन कमांडो भारतीय नौदलातील स्पेशल फोर्स कमांडो आहेत. नौदलातील मार्कोसना अनेक विशेष मोहिमांसाठी प्रशिक्षित केलं जात. हे कमांडो समुद्र, हवेत आणि जमिनीवर विशेष मोहिमा राबवू शकतात. हे कमांडो शत्रूच्या युद्धनौका, लष्करी तळावर हल्ले करतात आणि विशेष डायव्हिंग ऑपरेशन्स सारख्या गुप्त मोहिमा पार पाडतात. मार्कोस (MARCOS) हे सागरी क्षेत्रातील दहशतवाद्यांशी लढून त्यांना चोख प्रत्युत्तर देतात. सध्या काही मार्कोस दहशतवादविरोधी भूमिकेत काश्मीरमधील वुलर लेक परिसरात तैनात करण्यात आले आहेत.