India Pakistan Attack: भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेर गुरुवारी संध्याकाळी युद्धाला तोंड फुटले आहे. गेल्या काही तासांपासून पाकिस्तानने लढाऊ विमानं, क्षेपणास्त्रं, ड्रोन्स, रॉकेटस् या सगळ्यानिशी भारतावर जोरदार हल्ला चढवला होता. जम्मू, श्रीनगर, राजौरी, उरी, पठाणकोट अशा सर्व ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने एकाचवेळी हल्ला चढवला होता. मात्र, प्रत्युत्तरासाठी तयार असलेल्या भारतीय सैन्याने (Indian Army) पाकिस्तानला अक्षरश: धूळ चारली आहे. भारतीय सैन्याकडून तैनात करण्यात आलेल्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम, एल 70 आणि शिल्का या अँटी एअरक्राफ्ट गन्सने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स हवेतच नष्ट केली आहेत. तर भारतावर हल्ला करण्यासाठी आलेली पाकिस्तानची अत्याधुनिक एफ 16 आणि जेएफ 17 विमानंही पाडण्यात आली आहेत. एफ 16 आणि जेएफ 17 ही विमाने चीनने पाकिस्तानला दिली होती. मात्र, भारताच्या प्रतिहल्ल्यात चीनकडून मोठा गवगवा करण्यात येत असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही विमाने पाडण्यात आली आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, भारतीय सैन्याने दोन जेएफ 17 विमाने आणि 1 एफ 16 विमान पाडले आहे. याशिवाय, पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याचे नियंत्रण करत असलेले इगल AWACS विमानही भारताने पाडले आहे. याच विमानाच्या साहाय्याने ड्रोन हल्ल्याचे नियंत्रण केले जाते. मात्र, आता हा कंट्रोल युनिटच नष्ट झाल्याने पाकिस्तानचा ड्रोन हल्ला विफल झाला आहे. हा पाकिस्तानसाठी खूप मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तानकडे सध्याच्या घडीला फक्त दोन इगल AWACS विमाने आहेत. त्यापैकी एक विमान भारताने नष्ट करणे हे पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे.
राजौरीत भारतीय सैन्यावर फिदाईन हल्ला
एकीकडे पाकिस्तानी लष्कराने भारतावर हल्ला सुरु केला असताना दहशतवाद्यांनीही भारतीय सैन्यावर हल्ला चढवला आहे. राजौरी येथे काही दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या 120 व्या ब्रिगेडवर आत्मघाती हल्ला केल्याची माहिती आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैन्याच्या जैसलमेर येथील मुख्यालयावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा हल्ला अपयशी ठरला. यानंतर आता भारताने प्रतिहल्ला सुरु केला आहे. भारतीय वायदूलाची चार ते पाच लढाऊ विमाने हवेत झेपावली आहेत. ही विमाने पाकिस्तानच्या दिशेने गेली आहेत. तसेच भारतीय सैन्याकडून लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.
आणखी वाचा
पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली