Su‑30MKI Crash, Flt Lt Purvesh Duragkar: आसाममधील कार्बी आंगलोंग भागात प्रशिक्षणादरम्यान रडारवरून गायब झालेले भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-30 एमकेआय (Su‑30MKI Crash) लढाऊ विमान कोसळले. या अपघातात दोन्ही वैमानिक, स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट महाराष्ट्राचे सुपूत्र पूर्वेश दुरगकर यांना वीरमरण आले. पूर्वेश दुरगकर भंडारा जिल्ह्यातील आहेत. तीन वर्षांपूर्वीचे ते पास आऊट झाले होते. 

फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरूगकर कोण आहेत? (Flt Lt Purvesh Duragkar)

फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरूगकर भंडारा जिल्ह्यातील शहापूरमधील आहेत. त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनिअर कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. तीन वर्षांपूर्वीच ते पासआऊट झाले होते. तरुण आणि उमदा पायलटच्या जाण्याने भंडारा जिल्ह्यात शोकसागरात बुडाला. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

नेमकं काय घडलं? 

आज (6 मार्च) पहाटे 1 वाजून मिनिटांनी हवाई दलाने एसयू-30 एमकेआय अपघाताची पुष्टी केली. आज हवाई दलाकडून दोन्ही पायलट शहीद झाल्याची माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली. दरम्यान, एसयू-30 एमकेआयची शोध मोहीम सुरू आहे. अपघात झाला तेव्हा लढाऊ विमान नियमित उड्डाण किंवा मोहिमेवर होते. या दरम्यान, त्याचा जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटला. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, रडारशी संपर्क तुटल्यानंतर, हवाई दलाने तत्काळ अलर्ट जारी केला आणि घटनेची चौकशी करण्यासाठी आयएएफ टीम आसामला पाठवली. विमानाचे नेमके स्थान आणि संपर्क तुटण्याचे कारण सध्या शोधले जात आहे.

सुखोई हे बहुउद्देशीय लढाऊ विमान (What Is Su‑30MKI) 

सुखोई एसयू-30 एमकेआय हे भारतीय हवाई दलातील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. हे दोन इंजिन असलेले बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे जे हवाई संरक्षण, लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी आणि देखरेखीसाठी वापरले जाते.

एसयू-30 एमकेआय 12 वर्षांत भारतात 8 वेळा अपघात

1. 4 जून 2024 - नाशिक 

भारतीय हवाई दलाचे एसयू-30 एमकेआय जेट प्रशिक्षण उड्डाणावर होते. उड्डाणादरम्यान, विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते नाशिकजवळील शेतात कोसळले. दोन्ही वैमानिक वेळेत बाहेर पडले आणि बचावले.

2. 28 जानेवारी 2023 - मध्य प्रदेश

ग्वाल्हेरहून प्रशिक्षण मोहिमेवर उड्डाण करणारे दोन लढाऊ विमाने, एक एसयू-30 एमकेआय आणि एक मिराज-2000, हवेतच आदळली. एसयू-30 एमकेआयचे दोन्ही वैमानिक सुरक्षित बचावले, परंतु मिराज-2000 चा वैमानिक मृत्युमुखी पडला.

3. 8 ऑगस्ट 2019 - तेजपूर, आसाम

तेजपूर हवाई तळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला. वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले.

4. 27 जून 2018 - नाशिक 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे चाचणी वैमानिक SU-30MKI चे चाचणी उड्डाण करत होते. विमान कोसळले. दोन्ही वैमानिक वेळेत बाहेर पडले आणि सुरक्षित राहिले.

5. 23 मे 2017 - अरुणाचल प्रदेश सीमावर्ती क्षेत्र

तेजपूर हवाई तळावरून उड्डाण घेतल्यानंतर SU-30MKI शी संपर्क तुटला. विमानाचे अवशेष नंतर अरुणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात सापडले. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.

6. 15 मार्च 2017 - बारमेर, राजस्थान

प्रशिक्षण मोहिमेदरम्यान विमान कोसळले. दोन्ही वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले. या अपघातात जमिनीवर असलेले तीन जण जखमी झाले.

7. 17 ऑक्टोबर 2014 - पुणे 

पुण्याजवळ प्रशिक्षण उड्डाणादरम्यान एक SU-30MKI विमान कोसळले. दोन्ही वैमानिक वेळेत बाहेर पडले आणि सुरक्षित राहिले.

8. १९ मे 2015 - तेजपूर, आसाम

विमानाने तेजपूर हवाई तळावरून उड्डाण केले परंतु उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड निर्माण झाला. वैमानिक बाहेर पडले आणि सुरक्षित बचावले.

इतर महत्वाच्या बातम्या