सूर्य आग ओकणार, देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. देशातील बहुतांश रपाज्यातील तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या आसपास गेला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे.

India Weather : हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. देशातील बहुतांश रपाज्यातील तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या आसपास गेला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीसह अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
'या' भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढणार
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 6 किंवा 7 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. पुढील सहा दिवस उन्हाचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्येही तापमानाचा पारा चांगलाच वाढणार आहे. या भागात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
एप्रिल-जूनमध्ये कसं असेल हवामान?
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून दरम्यान भारतात सामान्यपेक्षा जास्त उष्णता राहण्याची शक्यता आहे. या काळात सहसा खूप उष्णता असते. यंदा उष्णतेने आणखी धोकादायक रुप धारण केले आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल रोजी कमाल तापमान 39 अंश आणि किमान तापमान 19 अंश राहण्याचा अंदाज आहे. लोकांना दिवसा सोसाट्याच्या वाऱ्याचाही सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पुढील तीन महिने तापानाचा पारा वाढणार असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना फटका बसत आहे. कधी उन्हाचा तडाका तर कधी ढगाळ वातावरण होत आहे.
6 एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढणार
6 एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात होणार आहे. कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 20 अंशांवर पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे 7 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 21 अंशांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 22 अंशांवर पोहोचेल. 9 एप्रिल ते 11 एप्रिल या कालावधीत कमाल तापमान 40 अंश आणि किमान तापमान 22 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दोन्ही दिवशी नागरिकांना कमालीची आर्द्रता आणि उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. दिवसा जोराचा वारा आणि उष्णतेची लाट यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:


















