Water Strike on Pakistan :  पाकिस्तानने (Pakistan) भारताशी युद्ध करण्याचे नको ते धाडस करून पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. शिवाय दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान (India Pakistan War) चहूबाजूनं कोंडीत सापडला आहे. असे असले तरी पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या 4  राज्यांमधील तब्बल 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले आहेत. मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पुन्हा एकदा पाकिस्तानचे मनसुबे वरच्या वर हाणून पाडले आहेत. परिणामी, पकड्यांची खोड काही केल्या मिटत नसल्याचे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे. त्यामुळे सर्वबाजूने पिटाळून लावलेल्या पाकिस्ताला भारताने आणखी एक धक्का देण्याचं ठरवले आहे. क्षेपणास्त्रांचा जोरदर मारा केल्या नंतर आता भारताकडून पुन्हा 'वॉटर स्ट्राइक' करण्याचे ठरवले आहे. चिनाब नदीवरील सलाल आणि बागलिहार धरणाचे अनेक दरवाजे भारताकडून उघडल्या गेले आहे. परिणामी पाण्याचा प्रचंड लोंढा पाकिस्तानच्या दिशेने वाहत आसून या एकाऐक सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताचा 'वॉटर स्ट्राइक', सलाल धरणाचे  पाच दरवाजे भारताने उघडले

पुढे आलेल्या माहितीनुसार, चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे  पाच दरवाजे भारताने उघडले आहेत. आतापर्यंत हे धरण बंद करून पाकिस्तानकडे जाणारे पाणी थांबवले जात होते. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताने हे पाऊल उचलले होतं. आता सलाल धरणाचे दरवाजे पुन्हा उघडल्यानंतर पीओकेमध्ये पुराची शक्यता वाढली आहे.  दरम्यान, मुसळधार पावसानंतर भारताने रामबनमधील बागलिहार धरणाचे दरवाजे देखील उघडले आहेत. भारताने स्पष्ट केले आहे की पाणी करार रद्द करण्यात आला आहे. यामुळे, आता भारताने किती पाणी सोडायचे हे आम्ही ठरवायचे आहे. आधी चिनाब नदीतील पाणी थांबवण्यात आले होते आणि आता धरण उघडण्यात आल्याने पाण्याचा प्रचंड लोंढा आता पाकिस्तानात पोहोचला आहे.

पाकिस्तानच्या अनेक भागात पुराचा धोका

दरम्यान, भारताच्या या'वॉटर स्ट्राइक'मुळे पाकिस्तानचा सखल भाग पाण्याखाली जाईल आणि पाकिस्तान भारताला पाणी का सोडले? हे विचारूही शकणार नाही. यामुळे पाकिस्तानातील लोकांच्या समस्या अधिक वाढतील आणि ते यासाठी पाकिस्तान सरकारला जाब विचारतील. अशातच आता पाकिस्तानातील अनेक भागात पुराचा इशारा देण्यात आला असल्याची माहितीही पुढे आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या