India vs Pakistan War Sudarshan Chakra S-400: पाकिस्तानकडून भारतावर (India vs Pakistan War) ड्रोनद्वारे हल्ले करण्यात येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या 4 राज्यांमधील 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला. उत्तरेत जम्मूमधील बारामुल्ला ते पश्चिमेत गुजरातमध्ये भुज दरम्यान पाकिस्तानने 26 शहरांना लक्ष्य केलं. नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले करत पाकिस्तानने भारतीय लष्कराला डिवचण्याचं काम केलं. मात्र काही वेळातच भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं. भारताच्या S-400 ने (Sudarshan Chakra S-400) पाकिस्तानकडून होणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले नष्ट केले.
श्री कृष्णाच्या हाती असलेलं सुदर्शन चक्र हे न्यायचं प्रतीक आहे आणि आज याच सुदर्शन चक्राने भारताच्या न्यायच्या लढाईत एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारताने आपली हवाई संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी, विशेषतः पाकिस्तान आणि चीनकडून येणाऱ्या संभाव्य धोक्यांविरुद्ध, एस-400 प्रणाली खरेदी केली होती. एस-400 क्षेपणास्त्राने भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स उडवली. पाकिस्तानने भारतीय शहरांवर डागलेल्या 15 क्षेपणास्त्रांना निष्क्रिय करण्यासाठी रशियन बनावटीच्या या S-400 संरक्षण प्रणालीचा वापर करण्यात आला. एस-400, ज्याला भारतीय सेवेत सुदर्शन चक्र म्हणूनही ओळखले जाते, ही रशियाने विकसित केलेली एक लांब पल्ल्याची, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली जागतिक स्तरावरील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते, जी विमाने, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना तोंड देण्यास सक्षम आहे.
काय आहे या एस-400 ची विशेषता?
- भारताने 'सुदर्शन चक्र' म्हणून संबोधलेली एस-400 संरक्षण प्रणाली 600 किमी अंतरावरून येणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मागोवा घेऊ शकते आणि 400 किमीच्या पल्ल्यातील या लक्ष्यांना रोखू शकते. भारत आणि रशियाने एस-400 च्या पाच स्क्वॉड्रनसाठी 35,000 कोटी रुपयांचा करार केला होता, त्यापैकी तीन वितरित झाले आहेत आणि उर्वरित दोन 2026 पर्यंत अपेक्षित आहेत.
- S-400 भारतातील सर्वात शक्तिशाली एअर डिफेन्स सिस्टीम-
- S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते.
- ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे.
- भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे.
- ही मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते.
- S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते.
- ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.
S-400 मिसाईल सिस्टीमची ताकद-
- S-400 ला जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम मानले जाते.
- ही सिस्टीम रशियाने तयार केली आहे.
- सुमारे 5 अब्ज डॉलर्सच्या करारानंतर 2018 मध्ये भारताने ही मिसाईल सिस्टीम खरेदी केली.
- या करारात भारताने 5 युनिट S-400 मिसाईल सिस्टीम्स खरेदी केल्या.
- S-400 ही मोबाईल लाँग-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे.
- ही प्रणाली स्टेल्थ फाइटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV (ड्रोन) यांना लक्ष्य करू शकते.
- यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात, ज्या 400 किमी अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात.
- यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600 किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात.
- एकावेळी 80 हवाई टार्गेट्स वर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते.
- सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांत फायरिंगसाठी तयार होते.
- यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ निष्फळ केला जाऊ शकतो.