मुंबई : पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. शनिवारी (28 फेब्रुवारी 2026) इस्रायलने अमेरिकेसोबत संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला चढवला. त्यानंतर तेहराननेही तातडीने प्रत्युत्तर देत पश्चिम आशियामधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

India Official Statement On Iran Isreal Conflict : भारताची अधिकृत प्रतिक्रिया

परराष्ट्र मंत्रालय (MEA) यांनी इस्रायल-इराण संघर्षाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, इराण आणि आखाती प्रदेशातील अलीकडील घडामोडींमुळे भारत अत्यंत चिंतित आहे. सर्व संबंधित पक्षांनी संयम बाळगावा, तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न करावेत आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Diplomatic Solution In Iran Isreal Conflict :  संवाद आणि कूटनीतीचा मार्ग

भारताने स्पष्ट केले की या प्रदेशातील तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि कूटनीती हाच योग्य मार्ग आहे. अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी शांततापूर्ण चर्चा व्हावी, तसेच सर्व देशांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा सन्मान राखला जावा, असेही मंत्रालयाने नमूद केले.

Continues below advertisement

Indian Advisory On Iran Isreal :  भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की संबंधित देशांमधील भारतीय दूतावास भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे आणि दूतावासाशी संपर्कात राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात मोठ्या लष्करी मोहिमेची घोषणा केल्यानंतर भारताने इस्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना शक्यतो घरातच राहावे, परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी, असे आवाहन केले आहे.

Netanyahu Warning Iran : नेतन्याहूंचा इराणला इशारा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली. इराणला अण्वस्त्र सज्ज होऊ देणे मानवतेसाठी धोकादायक ठरेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. इराणकडून दीर्घकाळ आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचा आरोप करत त्यांनी जागतिक समूदायाने याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले.

ही बातमी वाचा: