Coronavirus Cases Today : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात मागील 24 तासांत 16 हजार 167 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी म्हणजेच शनिवारी दिवसभरात 18 हजार 738 रुग्णांना नोंद आणि 40 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोना रुग्ण संख्या घटली यासोबत दुसरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.


15 हजार 549 रुग्ण कोरोनामुक्त


देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. रविवारी दिवसभरात 15 हजार 549 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आजपर्यंत 4 कोटी 34 लाख 99 हजार 659 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 5 लाख 26 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 






मुंबईत रविवारी 465 रुग्णांची नोंद


रविवारी मुंबईत 465 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 321 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,05,154 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 659 झाली आहे. 


महाराष्ट्रात रविवारी 1812 कोरोनाबाधित


नव्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात रविवारी 1812 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच राज्यात दिवसभरात एकूण 1675 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन  रुग्ण तर बीए. 2.75  चे 16 रुग्ण आढळले आहेत. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन रुग्ण तर बीए. 2.75  चे 16 रुग्ण आढळले आहे.  यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 275 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 250 वर गेली आहे.