India Pakistan War : भारत पाकिस्तान युद्धाला (India Pakistan War) सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहेत. सर्व बाजूंनी हल्ले सुरु केले आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. यानंतर पाकिस्तानने जागतिक बँकेकडे अपील केले आहे. मात्र, जागतिक बँकेनं पाकिस्तानला फटकारले आहे. यामध्ये आम्ही काहीही करु शकत नसल्याचे जागतिक बँकेनं म्हटलं आहे. 

भारताच्या वाट्याचे पाणी आता भारतासाठी वापरले जाईल

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमची भूमिका फक्त मध्यस्थीची आहे. जागतिक बँक ही समस्या कशी सोडवेल याबद्दल बरीच अटकळ आहे. भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे कायदा आणि न्याय राज्यमंत्री अकील मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान किमान तीन वेगवेगळ्या कायदेशीर पर्यायांची योजना आखत आहे, ज्यामध्ये कराराची मध्यस्थ संस्था असलेल्या जागतिक बँकेसमोर हा मुद्दा उपस्थित करणे समाविष्ट आहे. पंतप्रधान मोदींनी आधीच घोषणा केली आहे की भारताच्या वाट्याचे पाणी आता भारतासाठी वापरले जाईल. भारताच्या हक्काचं पाणी भारताच्या बाजूनेच वाहणार असल्याची भूमिका घेण्यात आली आहे. 

सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर पाकिस्तानचा संघर्ष

सिंधू करार स्थगित केल्यानंतर, भारत आता पाकिस्तानला हे सांगण्यास बांधील नाही की तो त्यांचे पाणी कधी सोडेल आणि किती वाजता थांबवेल. जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातून असे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत. चिनाब नदीवरील हे धरण पूर्वी कडक नियंत्रणाखाली होते कारण भारत पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवत होता.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यात भारतासह नेपाळमधील नागरिकाचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारताने पाकिस्तानला दिल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली होती. या हल्ल्याच्या काही तासांनंतर पाकिस्तानने काल रात्री भारतात ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक विमानतळं बंद ठेवण्यात आली आहेत. इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांनी १० मे पर्यंत विमान उड्डाणे थांबवली आहेत.

महत्वाच्या बातम्या:

India vs Pakistan War: भारताच्या सीमेजवळ जाऊ नका.. भारत पाकिस्तानच्या तणावात चीनी दूतावासाच्या नेपाळमधील आपल्या नागरिकांना महत्त्वाच्या सूचना