एक्स्प्लोर

सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार ट्रम्पला कोणी दिला? सुषमा अंधारेंचा सवाल, पंतप्रधान मोदींवरही टीका  

Sushma Andhare : सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या संदर्भात काहीही ठरवण्याचा अधिकार हा ट्रम्पला कोणी दिला? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. 

Sushma Andhare : पहलगाममध्ये झालेला हल्ला हा आमच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला होता. या हल्ल्याला आम्ही उत्तर देत असताना भारताने काय करावं याचे निर्देश देणारी अमेरिका पुन्हा एकदा आमच्या सार्वभौमत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधी किंवा नंतर एकाही सर्वपक्षीय बैठकीला हजर न राहणारे पंतप्रधान मोदी हे भारताला सांगायला का घाबरत आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या संदर्भात काहीही ठरवण्याचा अधिकार हा ट्रम्पला कोणी दिला? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. 

गेल्या दहा वर्षात मोदींनी वेगवेगळ्या देशात जे  आंतरराष्ट्रीय पर्यटन केले. त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृतीनुसार पेहराव करत त्या त्या राष्ट्र प्रमुखांसोबत चे फोटो व्हिडिओ बातम्या गोदी मीडियात चालवल्या. यापैकी एकही देश अत्यंत खुलेपणाने या कठीण प्रसंगांमध्ये भारतासोबत ठामपणे का उभा राहिला नाही? मग गेल्या दहा वर्षातलं आमचं परराष्ट्र धोरण फसलेलं आहे का? विविध देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध विकसित करत असताना भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी आम्ही इतर देशांची सहमती मिळवण्यामध्ये अपयशी ठरलो आहोत का?  हे मोदींनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन निधड्या छातीने सांगण्याची गरज आहे असे अंधारे म्हणाल्या.

जर मोदींच्या एका फोनवर यूक्रेन्स युद्ध थांबू शकत तर भारत पाकिस्तान मध्ये जो काही सामरिक तणाव सुरू झाला या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मध्यस्थी करणे हे कितपत योग्य आहे?
 भारतीय उपखंडातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या संदर्भात काहीही ठरवण्याचा अधिकार हा ट्रम्पला कोणी दिला? असा सवाल अंधारे यांनी केला आहे. 

इंदिरा गांधींनी कधीही  राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अमेरिका किंवा रशियाचा हस्तक्षेप मान्य केला नाही

जे मोदी भक्त सत्तर वर्षात गांधींनी काय केले किंवा नेहरूंनी काय केले असे प्रश्न विचारतात.  त्यांना किमान यानिमित्ताने एक उत्तर नक्की मिळाले असेल की देशाच्या प्रमुख म्हणून इंदिरा गांधींनी या पद्धतीने कधीही भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये अमेरिका किंवा रशियाचा हस्तक्षेप मान्य केला नाही. मोदींनी स्पष्टीकरण द्यायला हवे असे अंधारे म्हणाल्या. 
ट्रम्फ मेरे आंगने में तुम्हारा क्या काम है असे म्हणत अंधारे यांनी टोला लगावला. 

महत्वाच्या बातम्या:

Sushma Andhare: पाण्यात काठी मारल्याने पाणी तुटत नाही, राज-उद्धव भाऊ भाऊ, कुटुंब म्हणून एकत्र यावं, पण... : सुषमा अंधारे

महत्त्वाच्या बातम्या

G7 Summit : मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाल्यास मी धावून जाईन, पंतप्रधान बदलल्यास खात्री देत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
मोदी पंतप्रधान असताना भारतावर हल्ला झाल्यास मी धावून जाईन, पंतप्रधान बदलल्यास खात्री देत नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Embed widget