India Pakistan War : अखेर भारत पाकिस्तान यांच्या युद्ध (India Pakistan War) पेटलं आहे. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर या ठिकाणी पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे. भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या संपूर्ण कारवाईची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे.
पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. यावर भारत काय कारवाई करेल याची माहिती भारतीय लष्कराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील या सर्व कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.
भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ला सुरू झाला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला. दरम्यान, भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं. पाकिस्तानने ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या ठिकाणी जम्मू विमानतळ, जम्मू रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत आणि जम्मूला लागून असलेला सीमावर्ती भाग आरएस पुरा यांचा समावेश आहे. भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने पाकिस्तानच्या या हल्ल्याच्या प्रयत्नांना हाणून पाडले. पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने लाहोरमध्ये ड्रोन घुसवून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम निकामी केली. त्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. परिणामी पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तरीही पाकिस्तानने आता पुन्हा आगळीक केली आणि जम्मूवर ड्रोन हल्ला केला.
भारताने अनेक ड्रोन पाडले
पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताची एस 400 ही डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली असून त्याने पाकिस्तानचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले. जम्मूमध्ये नेमके किती ड्रोन आले याची नेमकी माहिती समोर आली नाही. पण भारताकडून ते सर्व ड्रोन पाडण्याची कारवाई सुरू आहे.