India Pakistan War : सध्या भारत पाकिस्तान युद्धजन्य (India Pakistan War) परिस्थिती असल्याने सगळ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना ड्युटीवर बोलविले.. अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील बोरगाव पेठ येथील बीएसएफ (BSF) महिला जवान रेश्मा इंगळे ह्या 15 दिवसाच्या सुट्टीवर आपल्या गावी आल्या होत्या पण त्यांना तातडीने ड्युटीवर हजर व्हायला सांगितले.. यावेळी सिमेवर जातांना त्या महिला जवानाच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून तुमचंही मन सुन्न झाल्याशिवाय राहनार नाही. कारण त्या एका वर्षाच्या बाळाला सोडून देशाच्या रक्षणासाठी गेल्या आहेत. 

Continues below advertisement


एक वर्षाच्या बाळाला सोडून महिला जवान पाकिस्तानच्या बॉर्डरवर


बीएसएफ महिला जवान रेश्मा इंगळे यांना एक वर्षाचा मुलगा आहे. त्यांना आठ दिवसच झाले होते. इकडे येऊन पण आधी देशसेवा मग कुटुंब म्हणत त्या आपल्या एक वर्षाच्या बाळाला सोडून पाकिस्तानच्या बॉर्डरवर (अमृतसर) रवाना झाल्या. रेश्मा इंगळे मार्च 2013 मध्ये बीएसएफमध्ये रुजू झाल्या होत्या. सुरुवातीला त्यांची पंजाबमध्ये ट्रेनिंग झाली त्यांनतर बांगलादेश बॉर्डरवर त्रिपुरा याठिकाणी होत्या. तिथून पुढे कच्छच्या  पाकिस्तान बॉर्डरवर आणि सध्या त्या पाकिस्तान बॉर्डर पंजाबमध्ये याठिकाणी तैनात आहेत. 


रेश्मा इंगळे यांचे पती भारत इंगळे गुजरातमधील बँकेत असिस्टंट मॅनेजर


15 दिवसाची सुट्टी घेऊन रेश्मा इंगळे ह्या आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी आल्या होत्या पण सीमेवर तणाव निर्माण झाल्याने त्यांना तातडीने ड्युटीवर बोलवलं आहे.. बाळ ढसाढसा रडत होतं आणि बाळाची आई जवान रेश्मा इंगळे यांच्या डोळ्यातून पाणी आले.. सासूच्या डोळ्यातही अश्रू फुटले.. रेश्मा इंगळे यांचे पती भारत इंगळे गुजरातमध्ये एका बँकेत असिस्टंट मॅनेजर आहेत. आपली नोकरी सोडून ते बाळाला सांभाळायला आले. भारत इंगळे म्हणतात मला गर्व आहे की, माझी बायको देशाच्या सीमेवर राहून देशाची सुरक्षा करते..


बाळाला सोडून जाताना खूप दु:ख होतंय


रेश्मा इंगळे म्हणाल्या, आमची आज देशाला गरज आहे. त्यामुळे बाळाला सोडून जाताना खूप दु:ख होतंय. आपण देशाच्या कामी येतोय,याचा अभिमान देखील वाटतोय. भारत आणि पाकस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला कॉल आले आहेत. तुमची सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय. तुम्हाला परत यायचंय, असंही सांगण्यात आलंय. त्याठिकाणची परिस्थिती पाहता, बाळाला सोबत घेऊन जाणे शक्य नाही. 




इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra SSC Board Result 2025 Live: यंदाचा दहावीचा निकाल 94.10 टक्के; निकालाची टक्केवारी घसरली, धाकधुक वाढली, निकाल कुठे पाहता येणार?