India Pakistan War : भारत पाकिस्तान युद्धाला (India Pakistan War) सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते, मात्र, भारताने हे सगळे हल्ल्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. जैसलमेरमध्ये भारताने पाकिस्तानची 30 हून अधिक पाकिस्तानी क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आहेत. माजी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये 30 हून अधिक क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि जैसलमेरचे खासदार कैलाश चौधरी यांनी याबाबतचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जैसलमेरच्या लोकांनी सुरक्षित आणि सतर्क राहिले पाहिजे. 30 हून अधिक क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आहेत.  पाकिस्तानने गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरु केले आहे. त्यांच्या या सर्व हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन 

कैलाश चौधरी यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, "जेव्हा शत्रू भ्याडपणा दाखवतो तेव्हा भारतीय सैन्य आपले शौर्य दाखवते. जैसलमेरमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्याला आमची शूर सेना धैर्याने प्रत्युत्तर देत आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, परिसरातील लोकांना सतर्क, सावध आणि जागरुक राहण्याचे आवाहन केले जाते.

 

मुख्यमंत्री भजन लाल यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक 

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या "ऑपरेशन सिंदूर" च्या पार्श्वभूमीवर, आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजस्थानच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना प्राधान्याने सैन्याला सहकार्य करण्याचे, आवश्यक संसाधनांची त्वरित उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आणि सीमावर्ती भागात मजबूत सुरक्षा राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

मी राज्यातील सर्व रहिवाशांना गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन करतो असे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले.