India Pakistan War : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अलीकडील गोळीबारामुळे अनेक निर्दोष नागरिकांचा बळी गेला आहे. या दु:खद घटनेवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शोक व्यक्त करण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची (ex-gratia) मदत जाहीर करण्यात आली आहे.

मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत 

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निर्दोष नागरिकांचे प्राण गेल्याने आम्हाला अत्यंत दु:ख झाले आहे. माझे सरकार आपल्या जनतेची हानी कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.” “कोणतीही भरपाई कधीच एखाद्या प्रिय व्यक्तीची जागा घेऊ शकत नाही किंवा कुटुंबावर झालेली मानसिक आघात भरून काढू शकत नाही. मात्र सहानुभूती आणि एकजुटीचा भाव म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल,” असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पर्यटकांच्या मृत्यूनंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूरला सुरुवात 

काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला, या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल होता. त्यानंतर या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केली होती. भारताने ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानचे अनेक लष्करी तळ नष्ट केले आहेत. त्यानंतर भारत पाक युद्धाला सुरुवात झाली आहे. भारत आणि पाकने एकमेकांवर ड्रोन आणि मिसाईल या अत्याधुनिक शस्त्रांच्या माध्यमातून हल्ले केले आहेत. 

दरम्यान, आज कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या टेक्निकल इन्स्टॉलेशन, कमांड सेंटर, रडार साईट आणि शस्त्रांच्या गोदामाला लक्ष्य केले. पाकिस्तानच्या रफिकी, मुरीद, चकलाला, रहिम यार, सुकूर या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले.  या पाच ठिकाणी भारतीय वायूदलाच्या फायटर जेटनी हल्ला केला. यामध्ये कुसूर येथील रडार आणि सियालकोट येथील लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानकडून लाहोरवरुन नागरी हवाई उड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गाचा दुरुपयोग केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar & Dilip Walse Patil: शरद पवारांनी इशारा करुन दिलीप वळसे पाटलांना लिफ्टमध्ये बोलावलं, सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवून दोघेच वरच्या मजल्यावर गेले, पण नंतर...