India Pakistan War : सध्या भारत आणि पाकिस्तानदरम्यान प्रचंड तणावाचं (India Pakistan Tension) वातावरण निर्माण झालं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर (Operation Sindoor) गोंधळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर अयशस्वी हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत. दि. 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्याजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाने (BSF) अत्यंत शौर्याने आणि तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली. या कारवाईत भारतीय सैन्याने (Indian Army) सात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांवर गोळीबार करत असताना पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.  

दि. 7 मे 2025 रोजी भारतीय लष्कराने "ऑपरेशन सिंदूर" (Operation Sindoor) राबवले. यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 स्थानांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी गटांच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईत किमान 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे जाहीर केले आहे.

28 दहशतवाद्यांना कंठस्नान 

यानंतर 9 मे 2025 रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाने (BSF) जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. 

भारताचे पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर 

दरम्यान, पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1 या क्षेपणास्त्राचाही समावेश होता. या कारवायांनंतर भारतीय सैन्याने आता ठोस प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून तीन ते चार महत्त्वाच्या हवाई तळांवर जोरदार हल्ले केले. या कारवाईत रावळपिंडीजवळील नूर खान हवाई तळ हे मुख्य लक्ष्य होतं. यासोबतच, मुरीद आणि सुकूर येथील हवाई तळांवरही भारतीय लढाऊ विमानांनी अचूक हल्ले चढवले. यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. भारतीय वायूदलाने पाकिस्तानचे तीन प्रमुख हवाई तळ उद्ध्वस्त केल्यामुळे आता या तळांवरून लढाऊ विमाने उड्डाण करू शकणार नाहीत, ज्याचा थेट फटका पाकिस्तानच्या हवाई क्षमतेवर बसणार आहे.

आणखी वाचा 

India vs Pakistan War: पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही हादरले!