India Pakistan War situation: भारतीय सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले (Air Strike) केले. त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली...पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला...अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
12.20 : भारत-पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित : BCCI
भारत पाकिस्तानमधील सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे IPL 2025 मॅच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. आयपीएलच्या आणखी 16 सामने रद्द करण्यात आले आहेत. आयपीलचे सामने आजपासून स्थगित करण्यात आले आहेत.
11.58 : Mumbai : आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित होण्याची शक्यता
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाळा इथे सुरु असलेला पंजाब वि दिल्ली सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधूनमधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याची चिन्हं आहेत. आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. 22 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकात्यातली ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजित होतं. मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे.
11.00 : टाटा हाॅस्पिटललाधमकीचा मेल आला असल्याची सूत्रांची माहिती
मुंबईतील टाटा कॅन्सर हाॅस्पिटल येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. टाटा हाॅस्पिटलला धमकीचा मेल आला असल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. या संदर्भात पोलिसांकडून सर्च आॅपरेशन सुरु आहे. बाॅम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल करण्यात आलं आहे.
10.28 : ताजमहाल, लाल किल्ला, इंडिया गेट सुरक्षा वाढवली
भारत पाकिस्तान यांच्यामधील युद्धजन्य पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ताजमहाल, लाल किल्ला, इंडिया गेटवर सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दिल्ली पोलिसांच्या गाड्यांची गस्त, असामाजिक तत्व, अनोळखी वस्तू दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
9.58 : पाकिस्तानमध्ये असीम मुनीर यांना नजर कैदेत ठेवण्यात येईल असा अंदाज कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला
पाकिस्तानमध्ये असीम मुनीर संदर्भात जे काही घडतंय ते अत्यंत महत्त्वाचे असून दाट शक्यता आहे की, त्यांना नजर कैदेत ठेवण्यात येईल असा अंदाज कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तानी आर्मीचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि आयएसआय मधील धुसफुसही यासाठी कारणीभूत असू शकते असे पटवर्धन म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानमधील घडामोडी पाहता शक्यता आहे की, पहलगाम मधील हल्ला आणि त्यानंतर भारतासोबत निर्माण झालेला तणाव यासाठी असीम मुनीर यांना जबाबदार ठरवून बळीचा बकरा बनवला जाईल. आणि असीम मुनीर यांना सर्व गोष्टीसाठी जबाबदार ठरवून पाकिस्तानी सरकार व पाकिस्तानी सैन्य नामनिराळा होईल असा अंदाज ही कर्नल पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.
9.46 : बारामुल्ला भागात पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा सीमारेषेवर हल्ला सुरु केला आहे. बारामुल्ला परिसरात पाकिस्तानी सैन्याने नागरी वस्तीवर गोळीबार केला आहे. या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
9.41 : भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बहुतांश हवाई हल्ले परतावून लावले
पाकिस्तानी सैन्याकडून काल रात्रीपासून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले चढवले जात आहेत. त्यासाठी रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचे बहुतांश हवाई हल्ले परतावून लावले आहेत. यामध्ये एस 400 एअर डिफेन्स सिस्टीम आणि एल 70 गन, Zu-23mm या अँटी एअरक्राफ्ट मशीनगन्स आणि शिल्का यंत्रणेने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
9.36 : चंदिगडमध्ये पुन्हा वाजले हवाई हल्ल्याचे सायरन
भारतीय सैन्याने काल रात्रभर पाकिस्तानमधील प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती अजूनही जिरलेली नाही. भारतीय वायूदलाने काल रात्रभर लाहोर, इस्लामाबाद यासह प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले करुन अनेक भाग बेचिराख केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केला आहे. पंजाबच्या चंदिगड परिसरात पाकिस्तानी सैन्याचे पाच ड्रोन शिरले आहेत. त्यापूर्वी चंदिगडमध्ये सायरन वाजतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. चंदिगडमध्ये आतापर्यंत पाच ड्रोन शिरल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडून हे ड्रोन्स पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानने आणखी किती ड्रोन्स चंदीगढमध्ये पाठवले आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, काल रात्री झालेल्या हल्ल्यात भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानी लष्कराचे 60 ड्रोन्स आणि 45 क्षेपणास्त्रं पाडली होती.
8.45 : India Pakistan War : युद्धजन्य पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर
युद्धजन्य पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं आवाहन केलं आहे. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय संस्थांना आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, स्थानिक यंत्रणांसोबत समन्वय ठेवण्याचे आदेशही देण्यात आलेत. औषधे, खाटा आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा, असेही निर्देश दिले गेले आहेत. अधिकाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा साठा करा नागरिकांनी ही मदत करण्याचं आवाहन फेडरेशननं केलं आहे.
7.45 : भारतीय लष्कराचं सीएफव्हींना सडेतोड उत्तर
7.39 : मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्त्वाची बैठक
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मच्छिमारांसोबत नौदलाची महत्त्वाची बैठक झाली. नौदल ठिकाणं संवेदनशील ठिकाणी मच्छिमारांना मच्छिमारीसाठी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. नौदलाने आखून दिलेल्या परिसरात आल्यास 'शूट टू किल'च्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच मुंबईतील मच्छिमार बोटींचं सर्वेक्षण करून एका अॅपच्या मदतीने त्यांचा डाटा गोळा केला जाणार आहे. पकिस्तानकडून गुजराती मच्छिमारांचया काही बोटी ताब्यात घेतल्या असून मच्छिमारांना सोडून बोटी जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. 26/11 प्रमाणे या बोटींचा वापर पाकिस्तानकडून केला जाण्याची शक्यता असल्याने नेव्हीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7.15: India Pakistan War: भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत देवेंद्र फडणवीसांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलावली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षेचा आढावा घेणार
Indian Army neutralized Pakistani Drones: भारतीय सैन्याने पाकिस्तानचे 50 ड्रोन्स निकाम केले
पाकिस्तानचा रात्रभर गोळीबार
पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता. तो अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलाय.
भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीत...आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं...पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले...14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं...भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं...
भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवलीय...भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारद केलीयत. चीननं दिलेले पाकिस्तानचे दोन जेएफ १७ आणि अमेरिकेच्या एका एफ १६ विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला...भारतानं दोन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्ताननंच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलीय...पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. एफ १६ विमानं अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेत. त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार ते पाहायचंय.
भारतानं जोरदार प्रत्युत्तर देऊनही नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरूच आहे. त्यात सीमेवरच्या निष्पाप लोकांचा बळी गेलाय...पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारतीय लष्करानंही आक्रमक पवित्रा घेत प्रतिहल्ला चढवला...पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं जोरदार कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर लक्ष्य करत भारतीय सैनिकांनी त्यांची पळता भुई थोडी केली.
आणखी वाचा