India Pakistan War: पाकिस्तानी दहशतवाद (Pakistani Terrorism) आणि पाकिस्तान सरकार (Pakistan Government) हे काही वेगळं नाही हे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. बुधवारी भारताानं ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) करत पाकिस्तानच्या (Pakistan) पेकाटात लाथ घातली. त्यानंतर पाकिस्तानचा खरा दहशतवादाचा चेहरा जगासमोर आला. पाकिस्तानी दहशतवादी हे पाकिस्तानी सरकारचे जावई असल्यासारखी वागणूक दिली जात आहे, हे काल भारतानं सिद्ध केलं. तसेच, भारतानं धडा शिकवल्यानंतर आता पाकिस्तान बराच बिथरला असून पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. 

भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हालचाली (Movement in Pakistan After India's Attack) वाढल्याचं पाहायला मिळतंय. पाककडून ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर जमवाजमव सुरू झाली आहे. पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत. तर, लाहोरमध्ये 'नोटीस टू एअर मिशन' जारी करण्यात आलं आहे. लाहोरकडे जाणारी-येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आलीत. त्यासोबतच पाकिस्तानकडून सीमावर्ती भागातली गावंही रिकामी करण्यात आली आहे. 

पाकिस्तानकडून बॉर्डरवरील गावं रिकामी 

पाकिस्ताननं लाईन ऑफ कंट्रोल आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील सियालकोट आणि छंब सेक्टरमधील एक डझन सीमावर्ती गावं रिकामी केल्याची माहिती मिळतेय. रात्रभर या भागात सैन्य, लष्करी वाहनं, पोलिसांचा फौजफाटा आणि डझनभर रुग्णवाहिकांची हालचाल दिसून आली. या भागातील सर्व रुग्णालय आणि पोलीस स्टेशन्सनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानकडून दहशतवाद्याला 'गार्ड ऑफ ऑनर'

भारताना एअर स्ट्राईक करत दहशतवादाला पाठींबा देणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाडला. तसेच, आता पाकिस्तानच्या कुरापतींचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. ज्यामुळे संपूर्ण जगभरातून प्रश्न उपस्थित केला जात आहे. लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी खालिद मुदस्सीरला पाकिस्तानी सैन्यानं काल चक्क 'गार्ड ऑफ ऑनर' दिला. दहशतवादाचा आम्हीही बळी आहोत, अशा बोंबट्या पाकिस्तान वेळोवेळी मारत असतो. मग दहशतवाद्याला गार्ड ऑफ ऑनरल कसा काय दिला? असा सवाल उपस्थित होत आहे.  

पाकिस्तानातील मुरीदके फुटबॉल स्टेडियममध्ये पोलीस आणि सैन्याच्या सुरक्षेत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांची अंत्ययात्रा काल काढण्यात आली. पाकिस्तानी लष्कराचे अनेक बडे अधिकारी या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते. त्यात एका व्यक्तीने जागतिक समुदायाचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. शवपेट्यांपुढे नमाज पढणारा हा कोणी धर्मगुरू नव्हता तर तो होता लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ. लष्कराचे अधिकारी या दहशतवादी रौफच्या खांद्याला खांदा लावून उभे होते.  

पाहा व्हिडीओ : Khalid Mubashir : दहशतवादी खालिद मुदस्सीरला पाकिस्तानी सैन्याचा गार्ड ऑफ ऑनर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pakistan PM Shahbaz Sharif On Operation Sindoor: भारताच्या 80 विमानांनी आमच्यावर हल्ला चढवला, 'खून की हर बूंद का बदला लेंगे; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानची दर्पोक्ती