नवी दिल्ली : भारतीय सैन्याकडून गुरुवारी (15 मे 2025) रोजी सांगितलं की, 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी काम करण्यावर सहमत झाले.
शस्त्रसंधी कायम ठेवण्यावर सहमती
भारत आणि पाकिस्तान यांच्या डीजीएमओमध्ये 12 मे रोजी चर्चा झाली होती. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सैन्य कारवाया रोखण्यावर आणि शस्त्रसंधी कायम ठेवण्यावर सहमती झाली होती. पाकिस्ताननं म्हटलं की तो सीमेपलीकडून एकही गोळी चालवणार नाही. चर्चेत सांगितलं गेलं की दोन्ही देशांनी एकही गोळी चालवू नये. एकमेकांविरोधात कोणत्याही प्रकारची आक्रमक कारवाई सुरु करु नये यावर चर्चा झाली.
सैन्य दलानुसार दोन्ही देश म्हणजेच भारत आणि पाकिस्तान सीमांवरील सैन्याच्या संख्येत कपात करण्याबाबत तात्काळ उपायांवर विचार करण्यात यावा. दोन्ही बाजूनं करण्यात येत असलेला गोळीबार आणि हवाई हल्ले थांबल्यानंतरची चर्चा अधिक महत्त्वाची राहिली.
पाकिस्ताननं ठेवला शस्त्रसंधीचा प्रस्ताव
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं केलेल्या कारवाईपुढं पाकिस्तानचा टिकाव लागला नव्हता. या लढाईत पाकिस्तानला पिछाडीवर पडला. पाकिस्ताननं 10 मे 2025 रोजी शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारतापुढं ठेवला होता. भारतानं शस्त्रसंधीचा प्रस्ताव आपल्या अटींवर स्वीकारला होता. भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तान सोबतच्या सैन्य स्तरावरील चर्चेत सहभाग घेतला. पाकिस्तानकडून डीजीएमओ मेजर जनर काशिफ अब्दुल्लाह यांनी भारतापुढं प्रस्ताव ठेवलेला.
22 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरनं प्रत्युत्तर
22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले होते. भारतानं यानंतर पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूर द्वारे प्रत्युत्तर दिलं. यापूर्वी भारतानं पाकिस्तानच्या नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द केला होता. याशिवाय सिंधू जल करार देखील स्थगित केला होता. सिंधू जल करार स्थगित केल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबवल्या जात नाहीत तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित राहील, असं म्हटलं.