China openly came in support of Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण युद्धबंदीच्या काही तासांनंतर पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या कृत्यांची पुनरावृत्ती केली. काही तासांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती आणि पण पाकिस्तान आपल्या कृतींपासून थांबत नाहीये. पुन्हा एकदा पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.
10 मे रोजी 5 वाजल्यापासून युद्धबंदी करार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु संध्याकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रोन हल्ले सुरू केले. पण, भारताने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व ड्रोन हल्ले हाणून पाडले. दरम्यान, चीननेही पाकिस्तानला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा देश पाकिस्तानचे "सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य" राखण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहील. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणादरम्यान या गोष्टी सांगितल्या.
याशिवाय, इशाक दार यांनी यूएईचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्धबंदी कराराचे स्वागत केले. यासोबतच, डार यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांना या प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.
डोनाल्ड ट्रम्प काय बोलले?
तत्पूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी एक सामान्य आणि समंजस निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद!”
शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन तासात पाकिस्तानने पुन्हा एकदा खरा रंग दाखवत भारतावर ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली. एक प्रकारे पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडले. पाकिस्ताननं डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वासघात करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले की, पाक हा विश्वासघातकीच आहे पण आता ट्रम्पला विचारायला हवं, तात्या तुम्ही हे काय केलं? तुमचं सांगून भारताने ऐकलं पाकिस्तानने तुमचं ऐकलं नाही का?
हे ही वाचा -