New Delhi: केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश येथून धार्मिक छळ टाळण्यासाठी भारतात आलेल्या अल्पसंख्याक समुदायांना भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले की, 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात दाखल झालेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना वैध पासपोर्ट किंवा प्रवासी कागदपत्रांशिवाय देशात राहण्याची मुभा मिळेल. (CAA New Rules)

Continues below advertisement


नागरिकत्व कायद्याशी (CAA) संबंध


न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी लागू झालेल्या नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यानुसार (CAA), 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या पीडित अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. परंतु 2014 नंतर भारतात आलेल्या अनेकांना आपल्या भविष्यासंदर्भात संभ्रम होता. नुकत्याच लागू झालेल्या आव्रजन आणि विदेशी (नागरिक) अधिनियम 2025 अंतर्गत जारी आदेशामुळे या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशामुळे विशेषतः पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना थेट फायदा होणार आहे.


गृहमंत्रालयाचे आदेश


गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, “अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तान येथील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन हे अल्पसंख्याक समुदाय धार्मिक छळामुळे किंवा त्याच्या भीतीने भारतात आश्रयासाठी आले असल्यास, आणि त्यांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला असेल, तरी त्यांना वैध पासपोर्ट आणि व्हिसाची सक्ती राहणार नाही.”


नेपाळ आणि भूतानसाठी काय नियम?


या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना भारतात येण्यासाठी किंवा राहण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्यकता नाही, बशर्ते ते थेट सीमा मार्गे भारतात प्रवेश करतील. मात्र, जर कोणी नेपाळी किंवा भूतानी नागरिक चीन, मकाऊ, हॉंगकॉंग किंवा पाकिस्तानमार्गे भारतात येत असेल, तर त्यांच्याकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे.


याचप्रमाणे भारतीय नागरिकांनाही नेपाळ किंवा भूतानला जाण्यासाठी व्हिसा अथवा पासपोर्ट लागत नाही. परंतु ते या दोन देशांव्यतिरिक्त इतर देशांतून भारतात परत येत असल्यास (चीन, मकाऊ, हॉंगकॉंग आणि पाकिस्तान वगळता) पासपोर्ट दाखवणे अनिवार्य असेल. तसेच भारतीय सैन्य, नौदल व हवाईदलाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, जर ते सरकारी वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करत असतील, तर त्यांना पासपोर्ट किंवा व्हिसाची आवश्यकता भासणार नाही.


हेही वाचा 


Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात भूकंपामुळे मोठा विध्वंस! मृतांचा आकडा 1400 वर, जखमी 3000 हुन अधिक, पहा थरकाप उडवणारे फोटो