नवी दिल्ली : एलएसी सीमारेषेवरील तणाव आणि दररोज नव्या युक्यांनी भारताबरोबर डाव खेळणाऱ्या चीनला संयुक्त राष्ट्रात आता मोठा झटका बसला आहे. आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) ची संस्था ‘युनायटेड नेशन कमिशन ऑफ ऑन स्टेटस ऑफ वुमन’ या संस्थेचा सदस्य म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली.
"प्रतिष्ठीत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC )चं सदस्यत्व भारतानं मिळवलं आहे. भारताची कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड झाली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणास प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही बांधिल असल्याचं हे महत्त्वपूर्ण समर्थन आहे. आम्ही सदस्य देशांना त्यांच्या समर्थनाबद्दल धन्यवाद देतो", असं ट्वीट टीएस तिरूमूर्ती यांनी केलं आहे.
चीनला निम्मी मतेसुद्धा मिळवता आली नाही
कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमनच्या निवडणुकीत भारताखेरीज अफगाणिस्तान आणि चीननेही भाग घेतला. या निवडणुकीत 54 सदस्यांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या बाजूने मतदान केले. तर चीनला निम्मी मतेसुद्धा मिळवता आली नाही. भारत निवडणूक जिंकला आणि इकोसॉकचा सदस्य झाला. यामध्ये चीनला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या विजयानंतर भारत पुढील चार वर्षांसाठी या आयोगाचा सदस्य असेल.
India-China Border | भारत-चीन सीमेवर नेमकं काय सुरू? युद्धभूमीवर 'एबीपी माझा' थेट लेहमधून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट