India Coronavirus Updates : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसत आहेत. पुन्हा एकदा दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 31,923 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 282 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच 24 तासांत 31,990 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


गेल्या सात दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी


16 सप्टेंबर :  34,403 रुग्ण 
17 सप्टेंबर : 35,662 रुग्ण 
18 सप्टेंबर : 30,773 रुग्ण 
19 सप्टेंबर :  30,256 रुग्ण 
20 सप्टेंबर :  26,115 रुग्ण 
21 सप्टेंबर : 26,964 रुग्ण
22 सप्टेंबर : 31,923 रुग्ण


देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 35 लाख 63 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 46 हजार 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 28 लाख 15 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांच्या आसपास आहे. सध्या 3 लाख 1 हजार 640 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. 



देशातील सध्याची कोरोना स्थिती : 


कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 35 लाख 63 हजार 421
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 28 लाख 15 हजार 731
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 1 हजार 640
एकूण मृत्यू : चार लाख 46 हजार 50
देशातील एकूण लसीकरण : 83 कोटी 39 लाख 90 हजार डोस


राज्यात काल (बुधवार)  3,608 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 48 जणांचा मृत्यू


कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. राज्यात काल (बुधवार)  3,608 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 285 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 49 हजार 029  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.21 टक्के आहे. 


राज्यात काल (बुधवार) 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 11, 344 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (10), नंदूरबार (1),  धुळे (1), जालना (50), लातूर (90), परभणी (75), हिंगोली (18), नांदेड (16),   अमरावती (92), अकोला (28), वाशिम (07), बुलढाणा (33), यवतमाळ (05), नागपूर (142),  वर्धा (5), भंडारा (3), गोंदिया (7), चंद्रपूर (72),   गडचिरोली (18 ) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


राज्यात सध्या 39 हजार 984 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,64,416 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,678  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 488 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 488 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 359 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,16,1116 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4706 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1187 दिवसांवर गेला आहे.