India Coronavirus Updates : देशात सलग 80व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 50 हजारांहून कमी आला आहे. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 27,176 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,012 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


केरळात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट 


केरळात मंगळवारी कोरोनाच्या 15,876 नव्या रुग्णांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 44,06,365 वर पोहोचली आहे. राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जवळपास 30 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत होती. परंतु, त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 24 तासांत 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मृतांची संख्या वाढून  22,779 इतकी झाली आहे. 


भारतातील कोरोना संसर्गाची स्थिती 


कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 33 लाख 16 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 43 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 22 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 51 हजार 087 रुग्ण अद्यापही कोरोनाशी लढा देत आहेत. 


कोरोनाची एकूण आकडेवारी :


कोरोना रुग्णांची एकूण संख्या : तीन कोटी 33 लाख 16 हजार 755
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 25 लाख 22 हजार 171
सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 51 हजार 087
एकूण मृत्यू : चार लाख 43 हजार 497
एकूण लसीकरण : 75 कोटी 89 लाख 12 हजार लसीचे डोस 


राज्यात काल (मंगळवारी) 3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 52 जणांचा मृत्यू


राज्यात काल (मंगळवारी) 3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 685  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 12 हजार 706  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 06 टक्के आहे. 


राज्यात काल (मंगळवारी) 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 671 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 101 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (10), नंदूरबार (2),  धुळे (1), जालना (36), परभणी (55), हिंगोली (17),  नांदेड (25), अकोला (29), वाशिम (01),  यवतमाळ (05),   वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), चंद्रपूर (51),   गडचिरोली (12 ) या 16 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 5,62,25,304 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,04,147 (11.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,96,176 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,875  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.