Coronavirus In India : देशात सध्या कोरोनामुळे (Kerala Corona Update) आणखी चिंता वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. केरळ राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारी, 19 डिसेंबर रोजी 292 कोविडबाधितांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये 2041 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच एकाच दिवसात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट (New Subvariant of Covid) भारतात (India Corona Update) आल्याचं समोर आलं आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये (Kerala) आढळून आलं आहे. JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले.
भारतात कोविड-19 च्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला बाधित 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवले गेले. यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले होते. इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) च्या जिल्हा-आधारित प्रकरणांची तपासणी आणि प्रकरणे लवकर शोधण्यासाठी सर्व आरोग्य सुविधांबाबत नियमितपणे अहवाल देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य खात्याने दिले आहेत.
राज्यात मंगळवारी 11 नवीन रुग्ण आढळले
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे (Maharashtra Coronavirus Updates) 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आले. आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 फक्त मुंबईत (Mumbai Coronavirus) सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहे. आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण आहेत. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईत कोरोनाचे 27 रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यात 5 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.
हे ही वाचा :