Agreements Between India And UAE: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol And Diesel Prices Hike) वाढले आहेत. पेट्रोल 3 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लीटर इतके महागले आहे. गेल्या काही दिवसांपासून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल, अशी चर्चा सुरू होती. अखेर, तेल कंपन्यांनी आजपासून (15 मे) इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा केली. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून, देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर काल सीएनजीचे दरही वाढवण्यात आले होते. (Petrol-Diesel Price Hike) 

एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दर वाढत असताना दुसरीकडे भारताला एक मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएई दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींच्या या यूएई दौऱ्यानिमित्त (PM Modi UAE Visit) भारताला मोठं गिफ्ट मिळालं आहे. भारत-यूएईमधील 5 महत्वाच्या करारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एलपीजी पुरवठ्यांबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. पेट्रोलियम रिझर्वविषयी देखील भारत आणि यूएई करार करण्यात आला आहे. (Agreements Between India And UAE)

भारत आणि यूएईमध्ये कोणकोणते करार झाले? (Which agreements were signed between India and UAE?)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्या उपस्थितीत भारत आणि यूएईने सामंजस्य करारांची (एमओयू) देवाणघेवाण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्याचा भारताला मोठा फायदा होणार आहे. आज जाहीर झालेले प्रमुख करार आणि गुंतवणुकीचे निर्णय खालीलप्रमाणे आहेत.

  1. भारत आणि यूएई यांच्यातील संरक्षण भागीदारीच्या आराखड्यावरील करार
  2. पेट्रोलियम साठ्यांवरील सामंजस्य करार
  3. पेट्रोलियम वायू (एलपीजी) पुरवठ्यावरील करार
  4. वडिनार येथे जहाज दुरुस्ती क्लस्टरच्या स्थापनेवरील सामंजस्य करार
  5. इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर, आरबीएल बँक आणि सन्मान कॅपिटलमध्ये 5 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा

पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचे केले आहे आवाहन- (Petrol-Diesel Price Hike)

गेल्या रविवारी, सध्याच्या संकटाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशाने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये इंधनाचा काटकसरीने वापर करणे, सोन्याची खरेदी पुढे ढकलणे आणि परदेश प्रवास स्थगित करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली असून, सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 95 च्या पातळीच्या खाली घसरले आहे.

आजचे महत्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर- (Petrol-Diesel Price Hike)

शहराचं नाव          नवीन दर (पेट्रोल)   नवीन दर (डिझेल)

मुंबई -                  106.54                93.14दिल्ली -                 97.77                 90.78चेन्नई -                  103.84               95.50कोलकाता -           108.41              95.13पुणे -                    107.84              94.45बंगळुरू -             102.96              94.10

संबंधित बातमी:

Petrol-Diesel Price Hike: ज्याची भीती होती, तेच झालं..., देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा मुंबईसह महत्वाच्या शहरातील नवीन दर