कर्नाटकमध्ये आमदाराच्या घरातून 120 कोटीची काळी माया जप्त
एबीपी माझा वेब टीम | 12 Feb 2017 10:00 AM (IST)
बंगळुरु: आयकर विभागानं कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या घरावर छापा टाकून, 120 कोटीच्या अघोषित संपत्ती जप्त केल्याजा दावा केला आहे. यामध्ये एक कोटी 10 लाख रुपयाची रोकड तसेच 10 किलोचं सोनं याचा समावेश असल्याची माहिती आयकर विभागाच्या वतीनं देण्यात येत आहे. कर्नाटकच्या होसकोटमधील आमदार एमटीबी नागराज आणि इतर सहकाऱ्यांविरोधात चोरीच्या आरोपाखाली तपास सुरु आहे. या अंतर्गतच गुरुवारी नागराज यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी त्यांच्या घरातून 120 कोटीची काळी माया जप्त केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. यामध्ये एक कोटी 10 लाख रुपयाची रोकड आणि 10 किलोग्रॅम सोनं जप्त करण्यात आल्याचा दावा आधिकाऱ्यांनी केला आहे.