Indore Road Accident: शुक्रवारी पहाटे इंदूरमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची मुलगी प्रेरणा बच्चन (26) यांच्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर कासलीवाल (25) आणि त्यांचा साथीदार मानसंधू (26) यांचाही जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या अनुष्का राठी या तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डंपरने धडक दिल्यानंतर कारच्या मागच्या सीटवर बसलेली प्रेरणा बच्चन बोनेटवर फेकली गेली यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. तिचा मृतदेह बोनेटवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर
या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेल्या वेळेनुसार, शुक्रवारी पहाटे 4 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. हे तिन्ही फुटेज हृदयद्रावक आहेत. तब्बल 130 च्या वेगाने जाणारी कार स्पष्टपणे दिसत सुद्धा नाही, परंतु अपघातापूर्वी आवाज ऐकू येतो. कार आणि डंपरच्या धडकेचा आवाज ऐकू येतो. पोलिस आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, 130-140 किमी/तास वेगाने गाडी चालवणारा तरुण दारूच्या नशेत होता.
गाडी सहा सेकंदांपर्यंत फरफटत गेली
पोलिस तपासात असे दिसून आले आहे की गाडी खूप वेगाने जात होती. तथापि, खरा वेग अद्याप निश्चित झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेजनुसार, टक्कर होण्याच्या फक्त सहा सेकंद आधी चालकाने ब्रेक लावला. ब्रेक लावताना, गाडी स्लीप होऊन डंपरला धडकली आणि त्यानंतर मोठा आवाज झाला.
प्रेरणा कारच्या मागील सीटच्या मध्यभागी होती
रालामंडलजवळील बायपासवर तीन जणांचा मृत्यू झालेल्या अपघातात पोलिस आणि एफएसएलच्या प्राथमिक तपासात महत्त्वाची तथ्ये उघड झाली आहेत. प्रेरणा कारच्या मागील सीटच्या मध्यभागी बसली होती हे तपासात पुष्टी झाली. जेव्हा वेगाने जाणारी कार समोरील डंपरला धडकली तेव्हा ती पुढे फेकली गेली. तिचे डोके डंपरला धडकले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, कारच्या पुढच्या सीटवर बसलेले प्रखर आणि मानसंधू यांना समोरासमोर झालेल्या धडकेत गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला.
डंपरवर केस आणि मांसाचे तुकडे आढळले
तेजाजी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र मरकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एफएसएल टीम घटनेचा तपास करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. कारला धडकलेल्या डंपरच्या मागील बाजूस प्रेरणाचे केस आणि मांसाचे तुकडे आढळले. याचे नमुने चाचणीसाठी जतन करण्यात आले आहेत. यावरून पुष्टी होते की टक्करच्या वेळी प्रेरणा थेट डंपरला धडकली. दोन्ही डंपर चालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
मागे सीट बेल्ट न लावल्याने धोका वाढला
अपघातानंतर प्रसिद्ध झालेल्या फोटोंवरून आणि तपासात असे दिसून आले आहे की प्रेरणा मागच्या सीटच्या मध्यभागी बसली होती आणि तिने सीट बेल्ट लावला नव्हता. त्यावेळी ती मित्रांशी बोलत असण्याची शक्यता आहे. जोरदार धडकेमुळे ती पुढे फेकली गेली, गाडीचा पुढचा भाग ओलांडला आणि डंपरला धडकली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तज्ञांच्या मते, नवीन मॉडेल्सच्या कारमध्ये मागच्या सीटवर तीन सीट बेल्ट देखील आहेत: बाजूच्या प्रवाशांसाठी दोन आणि मधल्या प्रवाशांसाठी एक. भारतात, आता मागच्या सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट अनिवार्य आहेत.
चालकासह कारमधील सर्व प्रवासी मद्यधुंद
पोलिसांचे म्हणणे आहे की अपघाताच्या वेळी चालकासह कारमधील सर्व प्रवासी मद्यधुंद होते. म्हणूनच वेगाने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि ती डंपरला धडकली. कारमध्ये जॉनी वॉकरच्या (मद्य कंपनीचे नाव) तीन रिकाम्या बाटल्या, अन्नपदार्थ आणि "हॅपी बर्थडे प्रखर" लिहिलेला ग्लास सापडला. कोको फार्मकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1ते सव्वा एकच्या च्या सुमारास हे चौघेही जेवणानंतर कारमधून बाहेर पडले. त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
