नवी दिल्ली : सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणाऱ्या महिला तांत्रिक क्षेत्रांमध्येही मागे नाहीत. हीच गोष्ट पुन्हा एकदा समोर आली आहे, ती म्हणजे गीक गॉडेस 2021 (Geek Goddess 2021) या स्पर्धेतून. या स्पर्धेत 73 हजार महिला प्रोग्रामर्सनी (Women technologist) सहभाग घेतला होता. ज्यामध्ये आयआयटी वाराणसीची (IIT BHU) तिसऱ्या वर्षीची विद्यार्थीनी संगीता मिश्रा (Sangeeta Mishra) हिने उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे.
'टेकगीग गीक गॉडेस' (TechGig Geek Goddess) ही स्पर्धा भारतातील सर्वात मोठी कोडींग स्पर्धा असून यामध्ये महिला टेक्नोलॉजिस्ट्स सहभाग घेत असतात. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा सर्वाधिक महिलांनी सहभाग घेतला होता. ऑनलाईन (Virtual) स्वरुपात पार पडलेल्या या स्पर्धेच्या सर्वच फेऱ्या चुरशीच्या आणि रंगतदार पार पडल्या. यावेळी एकूण 19 महिला तंत्रज्ञांनी विविध राऊंड्मध्ये सहभागी महिलांसोबत चर्चा केली. यावेळी कोरोना महामारीमध्ये तांत्रिक क्षेत्रात महिलांकडून कशाप्रकारे योगदान देण्यात आलं? अशाप्रकारच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सर्व फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी करत संगीता मिश्राने पहिला क्रमांक पटकावला खरा त्याशिवाय इतर चौघींचाही नंबर काढण्यात आला.
विजेत्यांची यादी -
प्रथम क्रमांक : संगीता मिश्रा
द्वितीय क्रमांक : आरोशी वर्मा
तृतीय क्रमांक : रुपम मिश्रा
चौथा क्रमांक : सोनल काडवने
पाचवा क्रमांक : आंशी बन्सल
हे ही वाचा :
- Instagram New Feature : Instagram आणणार नवं फिचर, 60 सेकंदांपर्यंतचे स्टोरीज व्हिडीओ करता येणार पोस्ट
- iPhone 12 चा उत्पादन खर्च 28 हजारांच्या जवळपास, मग दुप्पट किंमतीत खेरदी का? घ्या जाणून
- Airtel ग्राहकांसाठी खुशखबर! मिळवा फ्री 500MB डेटा; जाणून घ्या नव्या प्रीपेड प्लॅन्सबद्दल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha