Javed Akhtar at Ideas Of India : पाकिस्तानला त्यांच्याच देशात जाऊन सुनावल्यानंतर आता पाकिस्तानची निर्मितीच पूर्णपणे चुकीची आणि तर्कविसंगत असल्याचं दावा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केला आहे. ते एबीपी न्यूजच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमात बोलत होते. एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये गीतकार  जावेद अख्तर यांनी हजेरी लावली. यावेळी लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांनी जावेद अख्तर यांची मुलाखत घेतली. 'एखादे पुस्तक लिहिले अन् त्यात मानवाची सर्वात मोठी चूक कोणती आहे, याबद्दल लिहिले... तर त्यात पाकिस्तानची निर्मिती हे नक्कीच येईल. पाकिस्तानच्या निर्मितीमागे कोणताही तर्क नाही, असे जावेद अख्तर म्हणाले. 


पाकिस्तानातील आर्थिक परिस्थितीबाबत जावेद अख्तर यांनी चर्चा केली. ते म्हणाले की, मी तीन वेळा पाकिस्तानात गेलो आहे. पाकिस्तानातील शहरांमध्ये गरिबांची घरं आहेत, पण रस्त्यांवर बसलेली गरीब माणसं दिसत नाहीत. त्यांनी तशी सिस्टिम केली असावी. पाकिस्तानातील लोकांची त्यांच्या सैन्याबरोबर तुलना करणं ही शहाणपणाची गोष्ट नाही. तेथील तरुण मुलांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला. 


यावेळी जावेद अख्तर यांनी त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, एका कार्यक्रमासाठी मी पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होते. माझं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात एका महिलेनं मला प्रश्न विचारला की, आम्ही तुम्हाला व्यवस्थित भेटतो, चांगलं समजो.. पण तुमच्याकडे पाकिस्तानी लोकांना दहशतवादी समजलं जाते. त्यावर मी तिला सांगितलं की, तुम्ही तुमचा रेकॉर्ड बरोबर करा... आमच्या देशात अनेक नेते अथवा येथील लोक आले आहेत, त्यांना खूप सन्मान देण्यात आला आहे. 
 
जावेद अख्तर म्हणाले की, तुमच्यासारखे आमच्याकडे परिस्थिती नाही. तुमच्याकडे लता मंगेशकर यांचा कधीच कार्यक्रम झाला नाही. तुम्हाला सर्वांना आम्ही दहशतवादी समजत नाही. मी मुंबईत राहणारा आहे, आमच्या शहरात जे झालं ते तुम्हाला माहित आहे. ते लोक काही नॉर्वे अथवा इजिप्तमधील नव्हते. येथे फिरत आहेत, अशी तक्रार केल्यास वाईट वाटून घेऊ नका. 


एबीपी नेटवर्क 'आयडियाज ऑफ इंडिया'
एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) हा परिसंवाद 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे.


आणखी वाचा :
Javed Akhtar : मुंबई हल्ल्याबाबत आरसा दाखवल्यावर पाकिस्तानी भडकले, जावेद अख्तर म्हणतात; ''तेव्हा तर...'' 


पाकिस्तानात जाऊन केलेलं वक्तव्य, तेथील लोक, आर्थिक स्थिती या विषयांवर भरभरुन बोलले जावेद अख्तर