नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. दोन्हीही राज्यांच्या निकालांनी आपण नाराज नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.


संसदेत जाताना राहुल गांधी आणि सोनिय गांधींनी एबीपी न्यूजने याबाबत प्रश्न विचारला होता. अगोदर प्रश्न विचारला तेव्हा दोघांनीही मौन बाळगणंच पसंत केलं. मात्र आपण निकालावर नाराज नसल्याचं राहुल गांधी संसदेत जाताना म्हणाले.

हिमाचल प्रदेशात भाजपने विजय मिळवल्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एका राज्यातील सत्ता गेली आहे. तर गुजरातमध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे. भाजपने बहुमतापेक्षाही जास्त जागांवर आघाडी घेतली आहे.

अत्यंच चुरशीच्या बनलेल्या गुजरातमध्ये भाजपने बहुमतापेक्षाही जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीला मुसंडी मारलेल्या काँग्रेसची नंतरच्या फेरीमध्ये पिछेहाट झाली. पंतप्रधान मोदींसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. तर काँग्रेसनेही संपूर्ण ताकद पणाला लावली होती.