Delhi Shraddha Murder Case: संपूर्ण देशाला हादरवरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. श्रद्धाची हत्या करणाऱ्या अफताब पूनावाला यानं केलेलं क्रूरकर्मामुळे अनेकांना धक्का बसेल. दररोज बाहेर येणाऱ्या घटनामुळे अफताबची क्रूरता समोर येत आहे. श्रद्धा वालकरचं व्हॉट्सअॅप चॅट समोर आलेय, यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. अफताब श्रद्धाला मारत होताच, त्याशिवाय तो तिचं मानसिक शोषणही करत होता, असं या चॅट्समधून समोर आलेय. श्रद्धाचा एक जुना फोटो व्हायरल होतोय, यामधून अफताबची क्रूरता दिसत आहे.
श्रद्धा वालकर आणि तिच्या मित्रांमधील 24 नोव्हेंबर 2020 मधील व्हॉट्स अॅप चॅट व्हायरल झालेय. व्हॅट्सअॅफ चॅटमधून अफताबच्या क्रूरतेचा कळस दिसून येतोय. श्रद्धा मित्राला अफताबकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सांगत आहे. अफताब लवकरच घरातून निघून जाईल, असे मित्राला सांगितलेय. त्याशिवाय अफताबनं इतक्या भयंकर मारलेय की, बेडवरुन उठूही शकत नाही, असे श्रद्धानं आपल्या व्हॅट्सअॅप चॅटमध्ये मित्राला सांगितलेय.
श्रद्धानं व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काय म्हटलेय?
काल त्याच्या आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर सर्व काही ठिक झालं होतं.
तो आज जात आहे.
पण मी आज जाणार नाही, कारण त्यानं काल मला खूप मारलेय. माझा ब्लड प्रेशर कमी झालेय. शरिरावर जखमेच्या खुणा आहेत. अंगात ताकदच उरली नाही, बेडवरुन उठूही शकत नाही.
तो माझ्या घरातून जातोय, हे मला निश्चित करायचेय.
माझ्यामुळे तुला झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतेय.
श्रद्धाला मारहाण, फोटो व्हायरल -
अफताबनं मारहाण केल्यानंतर श्रद्धाचा एक फोटो समोर आला आहे. आरोपी आफताबची क्रूरता पुन्हा एकदा लोकांसमोर आली आहे. हा फोटो श्रद्धाच्या मित्राने समोर आणला आहे. ज्यामध्ये आफताबने श्रद्धाला केलेल्या मारहाणीनंतरच्या जखमा दिसत आहेत. फोटोमध्ये श्रद्धाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमा स्पष्ट दिसत आहेत. हा फोटो पाहून आफताबने श्रद्धाला किती बेदम मारहाण केली होती याचा अंदाज लावला जाऊ शकतो. हा फोटो डिसेंबर 2020 मधील आहे. अनेकवेळा श्रद्धा आफताबच्या हिंसाचाराची बळी ठरली. तिच्या हत्या करण्यापूर्वीही एकदा आफताबने श्रद्धाला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण नंतर श्रद्धाच्या रडण्यामुळे तो थांबला.
पोलिसांकडे पुरावे काय?
सूत्रांच्या माहितीनुसार श्रद्धाची हत्या करून त्याचे तुकडे केल्यानंतर रक्ताने माखलेले बाथरूम धुण्यासाठी आफताब ने अमाप पाण्याचा वापर केल्याचा समोर आहे. दिल्लीमध्ये प्रत्येक घराला वीस हजार लिटर पाणी मोफत आहे. त्यामुळे दिल्लीतल्या बहुतांश घरांमध्ये पाण्याचे बिल येत नाही, पण गेल्या पाच महिन्यांमध्ये आत्ताच्या फ्लॅटमध्ये पाण्याचे बिल तीनशे रुपये आलं होतं. म्हणजे आफताबने जे पाणी वापरलं तेच त्याच्याविरोधात पुरावा बनले आहे. आता पोलिसांना केवळ आफताबने आत्तापर्यंत ज्या बाबी सांगितल्या त्यामध्ये श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावला होता पासून ते दिल्लीतील कोण कोणत्या भागात श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले ते नार्कोटेस्टमुळे उघड व्हायला मदत होणार आहे आणि त्याच्याच मदतीने अफताबला लवकरात लवकर फाशीच्या तक्त्यापर्यंत न्यायला मदत होणार आहे.