स्वतःची कैफीयत मांडताना विश्वास गुप्ताला रडू कोसळलं. यावेळी त्यांने हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपही यावेळी केला.
हनीप्रीत आणि बाबा राम रहीमच्या संबंधा बद्दल सांगताना विश्वास गुप्ता म्हणाला की, "बाबा राम रहिमने सुरुवातीला हनीप्रीत आपली मुलगी असल्याचा बनाव करत होता. पण दोघांमध्ये 13 वर्षांचं अंतर होतं. या दोघांमध्ये बाप आणि मुलगीचं अंतर अजिबात नव्हतं."
विश्वास पुढे म्हणाला की, "एखाद्या व्यक्तीला मुल दत्तक घ्यायचं झाल्यास दोघांमध्ये 21 वर्षांचं अंतर लागतं. पण दोघांमध्ये 13 वर्षांचं अंतर असतानाही दोघे बेबनाव करत होते. 2013 मध्ये मी त्यांना दोघांनाही आक्षपार्ह स्थितीत रंगेहात पकडलं. यानंतर बाबा राम रहिम आणि त्याच्या गुंडांकडून माला धमकावलं जात होतं. माझ्या कुटुंबियांवरही दबाव टाकला जात होता. त्यामुळे बाबाविरोधात केलेले आरोप मागे घ्यावे लागले."
काय म्हणाला विश्वास गुप्ता?