नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी 'कामगार दिन' म्हणजे आजपासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


अशा अडकलेल्या लोकांना पाठवणे किंवा स्वगृही आणण्यासाठी प्रोटोकॉलनुसार संबंधित दोन्ही राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या एकाच ठिकाणी चालवल्या जातील. या श्रमिक स्पेशलच्या समन्वय आणि सुरळीत कारभारासाठी रेल्वे आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.


राज्यांच्या विनंतीनुसार रेल्वे चालणार
प्रत्येक राज्याने प्रवाश्यांना पाठवण्याअगोदर त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. जे निरोगी प्रवासी आहेत, अशानांच रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार आहे. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. सोबतचं या प्रवाशांच्या तुकड्या करुन पाठवण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वे आणि बस गाड्या सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक असेल. प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय प्रारंभीच्या स्टेशनवर पाठविणार्‍या राज्यांद्वारे करण्यात येणार आहे.


महाराष्ट्र दिनीचं मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले; केंद्र सरकारचा निर्णय


इच्छितस्थळी पोहचल्यानंतर पुन्हा तपासणी होणार
प्रवाशांच्या सहकार्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन व स्वच्छता ठेवण्यासाठी रेल्वे प्रयत्न करणार आहे. लांबचा प्रवास मार्गांवर, रेल्वे प्रवासादरम्यान जेवण पुरवण्यात येणार आहे. आपापल्या राज्यात गंतव्यस्थानावर पोहचल्यानंतर, संबंधित राज्य सरकारकडून प्रवाशांची पुन्हा प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकातून पुढील प्रवासाची सर्व व्यवस्था देखील राज्य करणार आहे. देशाला भेडसावणाऱ्या या संकट प्रसंगी भारतीय रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी देशसेवा करण्यासाठी वचनबद्ध असल्याची माहिती रेल्वेचे कार्यकारी संचालक राजेश दत्त बाजपेयी यांनी दिली आहे.


CM Uddhav Thackeray | 3 मे नंतर झोननुसार मोकळीक देणार : मुख्यमंत्री