Pakistan Hizbul Mujahideen: हिज्बुल मुजाहिदीनच्या महत्वाच्या पाच कमांडर्सपैकी एक असलेला इम्तियाज आलम उर्फ बशीर अहमदचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आलाय. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयसोबत झालेल्या वादानंतर आयएसआयनंच त्याचा काटा काढल्याचं बोललं जातंय. रावळपिंडीमध्ये नमाज पढून मशिदीतून बाहेर पडल्यानंतर बशीरवर गोळीबार झाला यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
इम्तियाज आलम उर्फ बशीर हा हिज्बुल मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य होता आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात बशीर अहमदचा मोठा हात होता. यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित झाल्यानंतर त्यानं पाकिस्तानात आसरा घेतला होता. इम्तियाज आलमचे मूळ गाव जम्मू काश्मीरच्या कुपवडा जिल्ह्यतील बाबरपोरा आहे. परंतु आलम पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार हिज्बुल मुजाहिदीन, लष्कर ए तोएबासाठी दहशतवादी आणि कॅडेर यांना एकत्र आणण्यासाठी ऑनलाईन प्रचार करत होता.
जाकिर मुसाची हत्या करण्याचा आरोप
इम्तियाज आलमवर 23 मे 2019 रोजी काश्मीरमध्ये अल- कायदाची शाखा असणाऱ्या अंसार गजवत-उल-हिंदचा मुख्य कमांडर जाकिर मुसाची हत्या करण्याचा आरोप लावण्यात आला होत. मे 2017 ला आलमने पाकिस्तान समर्थक हिज्बुल मुजाहिदीन सोडले. त्यानंतर त्याने खिलाफतची स्थापना केली.
ISI च्या इशाऱ्यानंतर सुटका
मार्च 2007 साल पाकिस्तानी सेनेने इम्तियाज आलमला ताब्यात घेतेले होते. त्यावेळी त्याने उत्तर विभागाचे कमांडर मोहम्मद शफी दार यांना बळ देण्यासाठी 12 दहशतवाद्यांची टीम पाठवली होती. ISI च्या इशाऱ्यानंतर त्याला सोडण्यात आहे.
दोन दिवसापूर्वी तीन दहशवाद्यांना अटक
दोन दिवसांपबर्वी जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये हिज्बुल मुजाहिदीन येथे तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आळे आहे. अटक करण्यात आलेले तिन्ह दहशतवादी शोपिया येथील रहिवारी आहे. एम अब्बास वागे, गौहर अहमद मीर आणि निसार अहमद शेख अशी नावे आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांनी एक पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझीन आणि 13 जिवंत पिस्टल राऊंड जप्त केले आहे.