अहमदाबादमध्ये हिट अँड रन, दृश्य सीसीटीव्हीत कैद
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2016 09:56 AM (IST)
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये हिट अँड रनचं प्रकरण समोर आलं आहे. शहातील एस जी हायवेवर एका भरधाव कारने स्कूटीला धडक दिली. त्यानंतर चालक कारसह तिथून पसार झाला. दोन तरुणी मंगळवारी दुपारी अँगल थिएटरच्या दिशेने अॅक्टिव्हावर जात होत्या. त्यावेळी दुसऱ्या दिशेने आलेल्या भरधाव कारने अॅक्टिव्हाला धडक मारली. ही धडक एवढी जोरदार होती की, स्कूटीवरील दोन्ही तरुणी हवेत उडाल्या आणि कारच्या बोनेटवर आदळल्या. यानंतरही कारचालक थांबला नाही. कारला धडकल्यानंतर तरुणी जमिनीवर कोसळल्या. दैव बलवत्तर म्हणूनच त्या दोघी बचावल्या. दोघीही सुरक्षित असल्याचं कळतं. मात्र चालक तिथून पसार झाला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधरावर पोलिस चालकाचा शोध घेत आहे. दरम्यान, दोन्ही तरुणींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाहा व्हिडीओ