Hindenburg Research on Adani Group : शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research on Adani Group) अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने तब्बल 54 हजार कोटींचा दणका बसला आहे. शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने एका अहवालात स्टॉक फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा हवाला देत अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे डाॅलरमध्ये बोलायचं झाल्यास अदानींच्या संपत्तीत सात अब्ज डाॅलरने घट झाली आहे. त्यामुळे अदानी समूहाकडून (Adani Group) अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्चविरोधात कायदेशीर कारवाईची चाचपणी करत आहे. त्यामुळे अदानी साम्राज्याला हादरा देणारा हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? अशी चर्चा छोट्या गुंतवणूकदारांपासून ते पार जगाच्या पाठीवरील गुंतवणूकदारांमध्ये रंगली आहे.


हिंडेनबर्ग रिसर्चकडून करण्यात आलेल्या खळबळजनक आरोपांमुळे समूहाच्या कंपन्यांमधील बाँड आणि शेअर्स खाली आले. हिंडेनबर्ग रिसर्चने स्टॉक मॅनिपुलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हिंडेनबर्ग रिसर्चकडून अदानी ग्रुपवर संशोधन सुरु होते. हे करत असताना त्यांनी अदानी ग्रुपशी संबंधित माजी अधिकाऱ्यांशी बोलून माहिती संकलित केली होती. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हिंडेनबर्ग रिसर्चकडे कॉर्पोरेट चुका शोधण्याचा आणि कंपन्यांविरुद्ध पैज लावण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.


Hindenburg Research on Adani Group : हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय?


नाथन अँडरसन यांनी 2017 मध्ये स्थापन केलेली, हिंडनबर्ग रिसर्च ही फॉरेन्सिक आर्थिक संशोधन संस्था आहे जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करते. हिंडेनबर्गने त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीत "मानवनिर्मित आपत्ती" शोधत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये लेखापरीक्षण अनियमितता, गैरव्यवस्थापन आणि अघोषित संबंधित-पक्ष व्यवहार. कंपनी स्वतःचे भांडवल गुंतवते.


हिंडेनबर्ग नाव कसे पडले?


हिंडेनबर्ग नावामध्येही रंजक किस्सा आहे. सन 1937 मध्ये हिंडेनबर्ग एअरशिपच्या (Hindenburg airship) हायप्रोफाइल आपत्तीच्या नावावरून हे नाव देण्यात आले. हिंडेनबर्ग एअरशिप न्यू जर्सीमध्ये उड्डाण करत असताना पेटले होते. संभाव्य गैरप्रकार शोधल्यानंतर, हिंडेनबर्ग सामान्यत: नफा कमावण्याच्या आशेने, लक्ष्य कंपनीविरुद्ध (Target Company) केस आणि पैज स्पष्ट करणारा अहवाल प्रकाशित केला जातो.


हिंडेनबर्ग संस्थापक कोण आहेत?


नॅथन अँडरसन हिंडेनबर्ग रिसर्च संस्थापक आहेत. अँडरसन यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय व्यवसायात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डेटा कंपनी फॅक्टसेट रिसर्च सिस्टम्स इंक येथे वित्त क्षेत्रातील करिअरची सुरुवात केली, जिथे त्यांनी गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांमध्ये काम केले.


हिंडेनबर्गची सर्वात हाय-प्रोफाईल पैज कोणती?


ज्या पद्धतीने अदानी ग्रुपविरोधात हिंडेनबर्ग रिसर्चने गंभीर आरोप केले आहेत, त्याच पद्धतीने 2020 मध्ये हिंडेनबर्ग रिसर्च चर्चेत आले होते. हिंडेनबर्गने सप्टेंबर 2020 मध्ये इलेक्ट्रिक ट्रक निर्माती कंपनी निकोला कॉर्पविरुद्ध पैज लावली होती. ज्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता, अशी माहिती वाॅल स्ट्रीट जर्नलशी बोलताना दिली होती. मात्र, त्यांनी रकम सांगण्यास नकार दिला होता. 


हिंडेनबर्गने निकोलाने त्यांच्या तांत्रिक विकासाबद्दल गुंतवणूकदारांना फसवल्याचे म्हटले होते. अँडरसन यांनी निकोलाने तयार केलेल्या एका व्हिडिओला आव्हान दिले होते. ज्यामध्ये त्यांचा इलेक्ट्रिक ट्रक वेगवान वेगाने जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वाहन एका टेकडीवरून खाली आणले गेले होते. विशेष यूएस ज्युरीने निकोलाचे संस्थापकांना गेल्यावर्षी गुंतवणूकदारांशी खोटे बोलल्याच्या आरोपावरून फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरविले आहे. 


किती कंपन्यां हिंडेनबर्गला लक्ष्य केल्या आहेत?


हिंडेनबर्गने 2017 पासून किमान 16 कंपन्यांमध्ये संभाव्य गैरकृत्यांचा भांडाफोड केला आहे. ट्विटर डीलवरूनही हिंडेनबर्ग रिसर्चने भाष्य केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या