Bilaspur Landslide : हिमाचलमध्ये भूस्खलन, धावत्या बसवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडून 18 ठार, अनेक जखमी
Himachal Pradesh Landslide Bus Accident : अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्याला गती देण्यात आली असून जखमींना त्वरीत मदत मिळावी यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

Himachal Pradesh Landslide : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर (Bilaspur) जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी भूस्खलनाची (Landslide) घटना घडली. झंडूता विधानसभा क्षेत्रातील बरठीं (Barthin) परिसरात झालेल्या या भीषण घटनेत प्रवासी बसवर मोठी दरड कोसळली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी (Injured) आहेत.
बसमध्ये एकूण 30 प्रवासी
मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूरमधील भल्लू पुलाजवळ (Bhallu Bridge Bilaspur) एका बसवर अचानक दरड कोसळली. त्यावेळी बसमध्ये 30 प्रवासी (Passengers) प्रवास करत असल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना घुमारवी (Ghumarwin) आणि झंडूता (Jhanduta) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Bilaspur, Himachal Pradesh | At least 10 people were killed and several others injured after a private bus was hit by a landslide in the Balurghat area of Jhandhuta subdivision in Himachal Pradesh’s Bilaspur district. Excavation and rescue operations are continuing on a war… pic.twitter.com/1mlKWXCDkQ
— ANI (@ANI) October 7, 2025
सततच्या पावसामुळे अपघात
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून बिलासपूर भागात जोरदार पाऊस (Heavy Rainfall) पडत होता. त्यामुळे डोंगराळ भागातील उतार काहीसे खचले होते आणि त्यामुळे हा भीषण अपघात (Accident) झाला.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
या अपघाताची माहिती मिळताच प्रशासन (Administration) आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकदेखील प्रशासनास मदत करत आहेत. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या घटनेवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (CM Sukhvinder Singh Sukhu) यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना (Condolence) व्यक्त करताना सांगितले की, राज्य सरकार या कठीण काळात या कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे.
बचाव कार्यात गती आणण्याचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला बचाव कार्यात (Relief and Rescue Operations) अधिक गती आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी जखमींना त्वरित उपचार मिळावेत आणि त्यांच्या वैद्यकीय सोयींची पूर्ण व्यवस्था करण्यात यावी, असेही सांगितले आहे. शिमलामधून (Shimla) ते स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Saddened by the loss of lives due to a mishap in Bilaspur, Himachal Pradesh. My thoughts are with the affected people and their families during this difficult time. Praying for the speedy recovery of the injured.
— PMO India (@PMOIndia) October 7, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next…

















