Himachal Pradesh Diesel Price: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh News) डिझेलच्या दरांत (Diesel Price) वाढ झाली आहे. सुखू सरकारनं (Sukhvinder Singh Sukhu) डिझेलच्या किमतीवर व्हॅट वाढवला आहे. हिमाचलमध्ये, (Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu) सुखू सरकारनं डिझेलवरील व्हॅटमध्ये 3 रुपयांची वाढ केली आहे, त्यानंतर आता हिमाचल प्रदेशात डिझेलची किंमत 83.02 रुपये प्रति लिटरवरून थेट 86.05 रुपये प्रति लिटर झाली आहे. तर पेट्रोल 95.07 रुपयांनी 0.55 रुपयांनी स्वस्त विकलं जात आहे. तर महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमधील काही शहरांमध्ये इंधन दरांत किरकोळ बदल झालेले आहेत. 


नवे दर कधी जारी केले जातात? 


पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 0.44 रुपयांनी वाढून 107.51 रुपये आणि डिझेल 0.41 रुपयांनी वाढून 94.14 रुपये प्रतिलिटर झाले आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि गोव्यात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवे दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतकं महागात खरेदी करावं लागतं. दरम्यान, देशात तब्बल सात महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. परंतु, दरम्यानच्या काळात काही राज्यांनी व्हॅटमध्ये केलेली कपात यामुळे काही राज्यांतील दरांमध्ये बदल झाले होते. 


पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत यापूर्वी 22 मे रोजी देशातील चार महानगरांमध्ये झाला होता. जवळपास सात महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे, 22 मे 2022 रोजी सरकारनं उत्पादन शुल्क कमी केलं होतं, त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर नव्या सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 


Petrol Diesel Price Today : देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर



  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर


Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.


इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Petrol-Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर काय? गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी झटपट चेक करा