High Court New Chief Justices : सर्वोच्च न्यायालयाच्या (High Court) कॉलेजियमने शिफारस केल्यानंतर काही दिवसांतच, शनिवारी देशभरातील आठ उच्च न्यायालयांमध्ये नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे या नियुक्त्यांची घोषणा केली. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश न्यायमूर्ती वल्लुरी कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आता कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील.

Continues below advertisement

Announcement of New Chief Justices: कोणाची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती होणार?

छत्तीसगड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिकडे ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राम महापात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Continues below advertisement

 Arjun Ram Meghwal: केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडून  नियुक्त्यांची घोषणा

गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अल्पेश यशवंत कोगजे यांची मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांची जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे या नियुक्त्यांची घोषणा केली.

Rajasthan High Court Dispute: राजस्थान उच्च न्यायालयात वादाच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती

राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा यांच्याभोवती अलीकडेच वाद निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी त्यांच्यावर गंभीर आणि अभूतपूर्व आरोप केले होते. दरम्यान, न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा: